कोकण

रत्नागिरीत 28 पोलिसांच्या प्रशासकीय बदल्यांचे आदेश; मोहितकुमार गर्ग

- राजेश शेळके

रत्नागिरी : जिल्हा पोलिस दलातील सहायक पोलिस फौजदार ते पोलिस हवालदार या पदाच्या 28 जणांच्या प्रशासकीय बदल्या आज करण्यात आल्या. पोलिस आस्थापना मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. बदली झालेल्या कर्मचार्‍यांच्या विनंती अर्जाचा विचार करून आणि प्रत्यक्ष समुपदेशनाद्वारे बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी दिले आहेत.

Orders for administrative transfer of 28 policemen in Ratnagiri district kokan marathi news

पोलिस दलातील बदली झालेल्या कर्मचार्‍याचे मुळ ठिकाणी बदलीच्या ठिकाणाची यादी अशी, सहायक पोलिस फौजदार जितेंद्र विठ्ठल घाणेकर यांची चिपळूण पोलिस ठाण्याहून खेडला बदली. पोलिस हवालदार राजेंद्र कमलाकर भाटकर यांची रत्नागिरी मुख्यालयातून रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात बदली. हवालदार भूषण जयसिंग सावंत यांची खेडहुन दापोली पोलिस ठाणे, संदीप मनोहर साळवी जयगडहुन रत्नागिरी ग्रामीण पोलिस, विजय भिकू येलकर खेडहुन चिपळूण पोलिस ठाणे, पृथ्वीराज दशरथ देसाई पुर्णगडहुन बाणकोट पोलिस ठाणे, मुकुंद मोरु महाडीक नियंत्रण कक्षातून रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाणे, जितेंद्र भालचंद्र साळवी मुख्यालयातून लांजा पोलिस ठाणे, सुजाता संदीप मोहिते चिपळुणहुन सावर्डे पोलिस ठाणे, विजय ज्ञानेश्वर तोडणकर मुख्यालयातून संगमेश्वर पोलिस ठाणे, मोहन रामचंद्र कांबळे दापोलीहुन रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाणे, घनशःम रामचंद्र जाधव पुर्णगडहुन रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाणे, भालचंद्र श्रीराम रेवणे पुर्णगडहुन लांजा पोलिस ठाणे,

विजयकुमार गुंडाप्पा चावरे ग्रामीण पोलिस ठाण्याहून लांजाला बदली, उत्तम चंद्रकांत पिलणकर जिल्हा विशेष शाखेतून नाटे पोलिस ठाणे, दत्ताराम शांताराम बाणे देवरुखहुन मंडणगड पोलिस ठाणे, संदीप शांताराम कोळंबेकर स्थानिक गुन्हे शाखेतून जिल्हा विशेष शाखा, सौरभी संतोष कांबळे मुख्यालय रत्नागिरी शहर पोलिस ठाणे, नीता गोपाळ बेंडये रत्नागिरी ग्रामीणहुन पोलिस मुख्यालय, दीपक भिकाजी करंजवकर सावर्डेहुन राजापूर पोलिस ठाणे, समीर पद्माकर सावंत जिल्हा विशेष शाखेतून

पोलिस मुख्यालय, संजय शिवराम भारती पोलिस मुख्यालयातून जिल्हा विशेष शाखा, सुरेद्र शंकर शिंदे वाहतूक शाखेतून संगमेश्वर पोलिस ठाणे, स्वप्नील विजय साळवी अलोरेहुन खेड पोलिस ठाणे. नरेंद्र सिताराम चव्हाण खेडहुन अलोरे पोलिस ठाणे, संदीप अनंत नाईक चिपळूणहुन पुर्णगड पोलिस ठाणे, विद्या विनायक साळवी संगमेश्वरहुन पुर्णगड पोलिस ठाणे, अशोक महादेव पवार चिपळुणहुन अलोरे पोलिस ठाणे, अशा 28 पोलिस कर्मचार्‍यांचा प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. यामध्ये सहायक पोलिस फौजदार ते पोलिस हवालदारांचा समावेश आहे.

बदली रद्द, स्थगित केली जाणार नाही

बदली झालेल्या अंमलदारांना बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त न केल्यास संबंधित पोलिस ठाणे, शाखेच्या प्रभारी अधिकार्‍यांना जबाबदार धरण्यात येईल. बदली झालेले अंमलदार कोणत्याही प्रकारच्या रजेवर,गैरहजर असतील अशा अंमलदारांनाही स्थित कार्यमुक्त करावे. बदली आदेशाचा तारीख हाच नवीन नेमणुकीचा तारीख म्हणून ग्राह्य धरण्यात यावा. समुपदेशनाद्वारे बदल्या झाल्याने बदली आदेशात अंशतः बदल करणे, बदली रद्द करणे, बदलीला स्थगिती देणे अशाप्रकारच्या विनंतीची दखल घेतली जाणार नाही, अशी ताकीदही पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी दिली आहे.

Orders for administrative transfer of 28 policemen in Ratnagiri district kokan marathi news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT