Other State Vegetable Vendors Ban In Kudal From Today 
कोकण

परप्रांतीय भाजी विक्रेत्यांना`येथे` बंदी 

सकाळवृत्तसेवा

कुडाळ ( सिंधुदुर्ग) - शहरातील नागरीकांच्या हितासाठी परप्रांतीय भाजी विक्रेत्यांना उद्या (ता.23) शहरात विक्री करण्यास मनाई करण्यात येत आहे, असे नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी म्हटले आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी येथील नगरपंचायतकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जीवनावश्‍यक बाबींचा पुरवठा करण्यासाठी पुरेसे पास उपलब्ध तसेच शहराच्या परिसरात गावठी भाजी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने भाजीचा तुटवडा अजिबात भासत नाही. गावठी भाजीबरोबरच बेळगाव जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर भाजीची आवक होत असते.

बेळगांव शहरात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने भाजीच्या वाहतुकीसाठी कार्यरत असणाऱ्या मनुष्यबळाद्वारे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील नागरीकांच्या हितासाठी परप्रांतीय भाजी विक्रेत्यांना उद्या (ता. 23) शहरात विक्री करण्यास मनाई करण्यात येत आहे. कोणत्याही परप्रांतीय भाजी विक्रेत्यांनी बाजरपेठ परीसर अथवा मुख्य रस्त्यावर विक्री करु नये, असे नगराध्यक्ष तेली यांनी सूचित केले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसाचा कहर; सायन-पनवेल महामार्ग जलमय, वाहतूक व लोकल सेवा विस्कळीत

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणात मास्टरमाईंड बिजेंद्र गुप्ताला अटक

India's squad for the Asian Games 2026 : वर्ल्ड कप जिंकण्याची संधी गेली, आता आशियाई सुवर्णपदकासाठी तयारी; भारतीय संघाची घोषणा

Women T-20 Worldcup : टी-२० रणनीतीच्या फेरविचाराची गरज; अमोल मुजुमदार

'देऊळ बंद २'नंतर मोहन जोशींची नवी इनिंग! 'अभया'मध्ये साकारणार दमदार भूमिका

SCROLL FOR NEXT