Otwane Charatha Karivade Madkhol area earthquake shocks in sindhudurg 
कोकण

सिंधुदुर्गात सह्याद्री पट्ट्यात भूकंपाचा सौम्य धक्का

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : शहरासह ओटवणे, चराठा, कारिवडे, माडखोल भागाला आज रात्री  नऊ वाजण्याच्या सुमारास अचानक  सौम्य धक्का जाणवला. हा प्रकार भूकंपाचा होता की अन्य कशामुळे हे स्पष्ट होऊ शकले नाही. सह्याद्रीच्या काही भागातही असा प्रकार घडला.


 याबाबत अनेकांनी दुजोरा दिला; मात्र तिलारी पाटबंधारे विभागाचे सहाय्यक उप अभियंता बाळासाहेब अजगेकर यांनी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगितले.


तालुक्‍यातील ओटवणे, चराठा, माडखोल, कारिवडे तसेच सह्याद्री पट्ट्यातील काही भागातील ग्रामस्थांना रात्री आठ वाजून त्रेपन्न मिनिटांनी हलल्यासारखे जाणवले. याबाबत येथे राहणारे  अनिल कुडाळकर यांनी या घटनेबाबत दुजोरा दिला. ओटवणे येथेही काहींना भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला, काहींनी घरातील वस्तू हलल्याचे सांगितले; मात्र याबाबत अजगेकर यांना विचारले असता आपण सावंतवाडीतच होतो; मात्र आपणाला याबाबत काहीच जाणवले नाही, तिलारी कोनाळकट्टा येथील भूकंपमापक यंत्रणेलाही विचारण्यात आले. तरीही काहीच दर्शविण्यात आले नाही. त्यामुळे असा कोणताही प्रकार तालुक्‍यात घडला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : "अशोक खरातला मारून टाका", भोंदूबाबाच्या कारनाम्यावर संभाजी भिडे संतापले

Gold Rate Today: अमेरिकेच्या हालचालींनी सोनं हललं! महाराष्ट्रात आजचा ताजा भाव किती?

Latest Marathi News Live Update : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर वाहनांच्या रांगा

आर अश्विन, बावळट! अर्जुन तेंडुलकवर केलेल्या विधानामुळे भारताच्या माजी फिरकीपटूवर जोरदार टीका; अर्जुनवर बोलणारा तू कोण?

'पप्पा तुम्ही दुसरं लग्न करा' मुलींनी प्रकाश राज यांना लग्नाचा दिलेला सल्ला, 12 वर्षांनी लहान मुलीसोबत लग्न आणि...

SCROLL FOR NEXT