१६ जानेवारीपर्यंत रायगड जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात जमावबंदीचे आदेश Sakal
कोकण

Raigad News : सुरक्षेच्या दृष्‍टिकोनातून १६ जानेवारीपर्यंत रायगड जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात जमावबंदीचे आदेश

जिल्ह्यामध्ये बहुतांशी गावामध्ये हिंदू-मुस्लिम-बौद्ध तसेच इतर धर्मीयांची मिश्र लोकवस्ती आहे. अनेकदा वैयक्‍तिक कारणांवरून जातीय तेढ निर्माण होण्याची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा

Raigad News : रायगड जिल्हा पोलिस कार्यक्षेत्रामध्ये रोहा (धाटाव), नागोठणे, खालापूर, खोपोली, रसायनी, माणगाव, महाड (बिरवाडी), अलिबाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कारखाने आहेत.

कामगार संघटनांकडून अनेकदा विविध मागण्यांसाठी संप व आंदोलन पुकारण्यात येत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो. सुरक्षेच्या दृष्‍टिकोनातून रायगड जिल्हा पोलिस कार्यक्षेत्रात १६ जानेवारीपर्यंत वरिष्‍ठ‍ जिल्हादंडाधिकारी संदेश शिर्के यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहेत.

जिल्ह्यामध्ये बहुतांशी गावामध्ये हिंदू-मुस्लिम-बौद्ध तसेच इतर धर्मीयांची मिश्र लोकवस्ती आहे. अनेकदा वैयक्‍तिक कारणांवरून जातीय तेढ निर्माण होण्याची शक्‍यता असते. यावर उपाययोजना म्‍हणून प्रशासनाकडून जमाबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

यात शस्‍त्रे, तलवारी, भाले, बंदुका, सुरे, काठ्या, शारीरिक दुखापत होईल, अशी कोणतीही वस्तू बाळगणे, ज्‍वलनशील पदार्थ किंवा स्फोटक घेऊन फिरण्यास मनाई आहे. आक्षेपार्ह घोषणाबाजी, ज्‍यामुळे शांतता धोक्यात आणतील असे कृत्‍य करणाऱ्यांवरही पोलिसांची नजर आहे.

रायगड जिल्हा पोलिस कार्यक्षेत्रात पूर्व परवानगीशिवाय पाच अगर त्‍याहून अधिक व्यक्तीचा समावेश असलेल्या जमावास किंवा मिरवणुकीस मनाई करण्यात आली आहे. याबाबतच्या अधिसूचना संबंधित तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना देण्यात आल्‍या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने इतिहास घडवला! सर्वोच्च धावसंख्या, भारताविरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड; कॅम्बेल, होप अन् जांगूचे शतक, ४०० पार

Latest Marathi News Live Update : कर्नाटकातील 'मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड'मध्ये अचानक भीषण आग

कसाबच्या भूमिकेत ललित प्रभाकरला पाहून येईल चीड; राजकुमार रावही जबरदस्त, 'प्रहार' चा ट्रेलर बनला चर्चेचा विषय

SCROLL FOR NEXT