Overhead charged Ratnagiri and Rohan on the Konkan railway line konkan railway marathi news 
कोकण

सावधान : रोहा ते रत्नागिरी मार्गावरील गावांना कोकण रेल्वेचा सर्तकतेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गांवर रत्नागिरी व रोहा या दरम्यान ओव्हरहेड वायर विद्युत भारित करण्यात येणार आहे. तरी रेल्वे ट्रॅकच्या शेजारी असणाऱ्या गावातील नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे,  असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे. 


कोकण रेल मार्गावरील रोहा ते रत्नागिरी येथील  विदयुतकरणाचे काम अंतिम टप्यात आले आहे. या मार्गावरील विद्युत जोडणीचे कामही जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे विजेचा प्रवाह सोडून चाचणी करण्यासाठी रेल प्रशासन कार्यवाही करत आहे. ही चाचणी मंगळवारपासून सुरु झाली आहे. त्यामुळे कोकण रेल मार्गाजवळ  कोणत्याही ठिकाणी  वायर अथवा खांब तसेच कोणत्याही वस्तूला स्पर्श टाळावा. तसेच, लेव्हल क्रॉसिंग  गेट पार करताना ट्रॅक वरील तारेला स्पर्श करेल अशी कोणतीही गोष्ट - जसे की बांबू, शिडी, आंब्याचा घळ- तारेच्या आसपास पोहोचणार नाही अशी काळजी घ्या असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.


 रोहा ते रत्नागिरी मार्गावर ही विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे तरी रेल्वे मार्गानजीकच्या नागरिकांनी सतर्क रहावे कारण अशा तारा ना स्पर्श करणे प्राणघातक ठरू शकते अशी सूचना देण्यात आली आहे. दरम्यान विद्युत प्रवाह चाचणी यशस्वी झाल्यानंतर या मार्गांवर लोकल चालवून पाहण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात रोहा ते रत्नागिरी आणि पुढील टप्प्यात रत्नागिरी ते मडगांव असे विद्युतीकरण होणार आहे. सर्व चाचण्या केल्या नंतर जून पूर्वी गाड्या धावतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT