Overseas identification of the artist of Humersus on the strength of painting   
कोकण

हुमरसच्या कलाकाराची चित्रकलेच्या बळावर सातासमुद्रापार ओळख 

सकाळवृत्तसेवा

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - हुमरसच्या तरूणाने आपल्या कौशल्याच्या बळावर विदेशातही ओळख निर्माण केली आहे. अमित दयानंद नाईक या युवा चित्रकाराने आपल्या कलेच्या माध्यमातून सिंधुदुर्गाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. 

कला - संस्कृती केंद्राचे माहेरघर म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा ओळखला जातो. विविध क्षेत्रात या भागातून अनेक रत्ने होऊन गेली. त्यांचा वारसा अनेकजण त्या-त्या कला क्षेत्रात जोपासत आहेत. असाच एक युवा कलाकार जो हुमरससारख्या ग्रामीण भागातील असून त्याचे नाव अमित दयानंद नाईक आहे.

अल्पावधीतच या युवा चित्रकाराने देश विदेशात आपल्या कलेने नावलौकिक मिळविल्याने सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. दक्षिण कोरिया व लंडन देशात त्याच्या कलेला आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात आपली कला साकारण्याचा बहुमान मिळाला आहे. हे सिंधुदुर्गसाठी भूषणावह म्हणावे लागेल. नावाजलेल्या हिंदी मालिकासाठीही त्यांनी आपल्या कलेचे योगदान दिले आहे. 

अंगभूत सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आत्मविश्‍वास, जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा आणि त्याचबरोबर दुरदृष्टी कलेशी नितांत प्रेम असेल तर कलाकार यशाचे शिखर गाठू शकतो. निसर्गासह समाज जीवनातील वास्तव रूपाची चित्रे आपल्या कुंचल्याने रेखाटलेल्या मुंबईस्थित व मूळ कुडाळ तालुक्‍यातील हुमरस (सध्या रा. बेंगलोर) येथील 29 वर्षीय चित्रकार अमित यांचा अल्पावधीतील कलाप्रवास नजरेत भरण्यासारखा आहे.

काही वर्षापूर्वी कोरिया व लंडन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात आपली चित्रे मांडण्याचा बहुमान त्याला मिळाला. लहानपणापासूनच त्याला चित्रकलेची आवड होती. दहावीनंतर कणकवली येथे मूलभूत चित्रकलेचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने कोल्हापूर येथे दळवी आर्ट इन्स्टिट्यूट येथे आर्ट पूर्ण केले. मग सांगलीला त्याने डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन पूर्ण केले. चित्रकलेतील त्याने आपला प्रवास अखंड सुरू ठेवला.

व्यक्तिचित्र, निसर्गचित्र, अमूर्तचित्र अशा विविध कलाप्रकारात अमित पारंगत आहे. समाजातील वास्तवरूप व नैसगिक चित्रे कुंचल्याच्या सहाय्याने हुबेहूब रेखाटणाऱ्या युवा कलाकारांने आपली ओळख निर्माण केली आहे. 

अमितचे वडील दयानंद नाईक हे देखील कलाशिक्षक होते. नेमळे पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयात ते कलाशिक्षक होते. आसोली (ता. वेंगुर्ला) या निसर्गरम्य गावातील चित्रकार हरेकृष्ण भगवान पोलाजी यांचा आपण शिष्य असल्याचे अमित सांगतो. यापूर्वी त्याची भारतात मुंबई-गोवा पुणे यांसारख्या मोठ्या शहरात चित्र प्रदर्शने झाली. ऑस्टॅलिया, मुंबईसह विविध राज्यात त्याची चित्रे लोकांच्या संग्रही आहेत. या सर्व यशाचे श्रेय तो आपले आई-वडील, गुरू यांना देतो. हुमरस सरपंच अनुप नाईक यांचा अमित हा भाऊ आहे. 

कलाप्रवासात पहिलेच आंतरराष्ट्रीय प्रदर्शन 

कोरिया येथे "इंडियन आर्ट फेस्टिवल' या संस्था चित्रपट प्रदर्शनात भारतातून 43 चित्रकारांचा या प्रदर्शनात सहभाग होता. यामध्ये अमितला चित्रे मांडण्याचा बहुमान मिळाला. त्याचे ते पहिलेच आंतराष्ट्रीय चित्रप्रदर्शन होते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांची कला सातासमुद्रापार गेली आहे. त्यानंतर त्याच्या चित्राचे प्रदर्शन लंडन येथे झाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Rule: घेतलेलं कर्ज परत नाही केलंत? तर तुमचा फोन लॉक होईल, आरबीआयकडून नवा नियम आणण्याची तयारी

लई भारी! दुर्मिळ आजारने त्रस्त असलेल्या बाळाला जॅकलिनची मदत, उचलला शस्त्रक्रियेचा खर्च, व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Updates Live : ज्येष्ठ काँग्रेस नेते, केरळ विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि केपीसीसीचे माजी अध्यक्ष पी. पी. थानकाचन यांचे निधन

Sinnar News : सिन्नर एमआयडीसीत नवीन अग्निशमन बंब दाखल, उद्योगांना मोठा दिलासा

Beed Crime : हुंड्यासाठी अजून एक बळी; गेवराईच्या २२ वर्षीय नवविवाहितेने संपवले जीवन

SCROLL FOR NEXT