owner of the boat is from Murud village in Dapoli boat case kokan marathi news 
कोकण

 दोन दिवसांपूर्वी हर्णे बंदरावर सापडलेल्या बोटीची लागला छडा

सकाळ वृत्तसेवा

हर्णे (रत्नागिरी) : दोन दिवसांपूर्वी अचानक हर्णे बंदरात एक संशयास्पद बोट सापडल्यामुळे येथील स्थानिकांमधून घाबरून उलट-सुलट चर्चा सुरू झाली होती. परंतु हर्णे पोलिसांच्या तपासानंतर ही चर्चा आता थांबली असून या बोटीचा मालक हा दापोली तालुक्यातील मुरुड गावचाच असल्याचे हर्णे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, हर्णे पोलिसांच्या तपासात ही बोट मुरुड येथील मासूम एनरकर यांच्या मालकीची आहे असे निष्पन्न झाले. 

दोन वर्षांपूर्वी ही बोट श्रीवर्धन येथील सिद्दिक शिरगावकर यांना देण्यात आली होती. शिरगावकर यांनी ही बोट अडखळ जुईकर मोहल्ला येथील माजिद वाकणकर यांना दुरुस्त करून वापरण्यास दिली होती. दुरुस्तीसाठी आंजर्ले खाडीत उभी करून ठेवली असता बोटीला बांधलेला दोर तुटून समुद्रात आली परंतु ही अनोळखी बोट असल्याने स्थानिक मच्छीमार बांधवांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. कारण हर्णे बंदरात अश्या प्रकारची बोटच नसल्याचे येथील मच्छीमार बांधवांनी सांगितले. आणि हर्णे गाव संवेदनशील असल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

ग्रामस्थांना वाटले की कोणीतरी बोटीतून अनोळखी व्यक्ती आली आहे की काय ? अश्या उलट सुलट संशय आल्यावर तातडीने मच्छीमार बांधवांनी पोलिसांना , फिशरीज खात्याला तातडीने फोन करून घटनेची कल्पना दिली.
 त्यानंतर हर्णे दूरक्षेत्राचे प्रमुख मोहन कांबळे यांनी यांच्या टीमच्या साहाय्याने या नौकेचा छडा लावायचे ठरवले आणि दिवसभर आंजर्ले खाडी परिसरात गस्त घातली अखेर या बोटीचा मालक सापडला त्याचे नाव मासूम ऐनरकर (मुरुड, ता. दापोली) असल्याचे समजले. 

ऐनरकर यांनीही फायबर बोट पाच वर्षापूर्वी समुद्र सफरीसाठी आणली होती दोन वर्षापूर्वी श्रीवर्धन येथे दिली होती परंतु आता हर्णे समुद्र किनारी आढळल्याने या बोटीच्या प्रकरणावर पोलिसांनी पडदा टाकला आहे. बोटीतून कोणीही संशयास्पद आलेले नाही तसेच ही बोट संशयास्पद ही नसल्याचे पोलिसांनी सांगितले. ही बोट स्थानिक व्यवसायिकांची असल्याचे उघड होताच सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT