Paddy harvesting at Banda but fear of rain 
कोकण

भातकापणीला वेग; पण पावसाचे मळभ

नीलेश मोरजकर

बांदा (सिंधुदुर्ग) - पंचक्रोशीत सध्या भात कापणीच्या कामांना वेग आला आहे. चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यानंतर कापणी सुरू झाली आहे. त्यात काल (ता. 2) सकाळपासूनच थंड वाऱ्यासह पावसाचे मळभ होते. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्यास नुकसानीला सामोरे जावे लागणार असल्याने बळीराजा चिंतेत आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे कापणी खोळंबली आहे. 

दरवर्षीपेक्षा यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने पीक चांगले आले. येथील पंचक्रोशीत दोन दिवसांपासून उकाडा आहे. त्यात परतीच्या पावसाचे संपूर्ण शेतावर मळभ आल्याने पाऊस लागल्यास कापणी करून ठेवलेले भात पाण्यात भिजून हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे कापलेले भात गोळा करण्यास सुरूवात केली आहे. काही ठिकाणी उडवी करून ठेवण्यात बळीराजा मग्न दिसतो. 

"घास' वाचविण्याची धडपड 
गणेशोत्सव काळात पावसाने कृपादृष्टी दाखविल्याने सावंतवाडी तालुक्‍यात भात पीक जोमात आले आहे. सातार्डा, साटेली, न्हावेली, पाडलोस, मडुरा, रोणापाल, निगुडे, कास, शेर्ले गावात ढगाळ वातावरण आणि पावसामुळे कापणी खोळंबली आहे. हातातोंडाशी आलेले पीक धोक्‍यात आल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे. वाया जाऊ नये, यासाठी पीक शेतातच झोडण्याची लगबग सुरू आहे.  

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

SCROLL FOR NEXT