padve medical college inauguration konkan sindhudurg
padve medical college inauguration konkan sindhudurg 
कोकण

पडवेत आज मेडिकल कॉलेजचे उद्‌घाटन; अमित शहा येणार

विनोद दळवी

ओरोस (सिंधुदुर्ग) - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या (ता. 7) जिल्ह्यात येत आहेत. माजी मुख्यमंत्री भाजप नेते खासदार नारायण राणे यांच्या पडवे येथील एसएसपीएम मेडिकल कॉलेजचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. ते, गोवा येथून हेलिकॉप्टरने दुपारी दीड वाजता मेडिकल कॉलेजमध्ये दाखल होणार आहेत. देशव्यापी चक्काजाममुळे आजचा शहा यांचा दौरा रद्द झाला होता. उद्याचा शासकीय दौरा प्राप्त झाला नसला तरी खासदार राणे यांनी मंत्री शहा येणार असल्याचे जाहीर केले आहे. 

उद्‌घाटनासाठी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुंबई शहर अध्यक्ष आशीष शेलार, नेते विनोद तावडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. 

गृहमंत्री शहा यांना उद्‌घाटन करण्यासाठी निमंत्रित केले आहे. शहा आज येणार होते; पण शेतकरी विधयेकाविरोधात राष्ट्रीय चक्काजाम आंदोलन याच दिवशी होणार असल्याने त्यांनी आपला दौरा एक दिवसासाठी पुढे ढकलला. परिणामी पूर्ण तयारीनिशी सज्ज असलेल्या राणे यांनीही उद्‌घाटन एक दिवसासाठी पुढे नेले. त्यानुसार ते उद्या जिल्ह्यात येत आहेत. शहा यांच्या दौऱ्याची तारीख बदलली तरी यापूर्वी जाहीर वेळेनुसार ते, उद्या येणार असून त्याच वेळेत येथून हेलिकॉप्टरने गोव्यासाठी रवाना होणार आहेत. 

सिंधुदुर्ग भाजप त्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. आमदार नीतेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रदेश सचिव प्रमोद जठार, अतुल काळसेकर, सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी जोरदार नियोजन केले आहे. श्री. शहा हेलिकॉप्टरने जिल्ह्यात येऊन जाणार असले तरी त्यानिमित्त जिल्ह्यात वातावरण निर्मिती करण्यासाठी जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणी हजारो बॅनर लावण्यात आले आहेत. उद्‌घाटन कार्यक्रमानंतर शहा भाजप पदाधिकाऱ्यांशी हितगुज करणार असल्याचे खासदार राणे यांनी पूर्वीच जाहीर केले आहे. 

लाईफटाईम मेडिकल कॉलेजचे उद्‌घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होत असल्याचा विशेष आनंद आहे. सिंधुदुर्गातील या मेडिकल कॉलेजचे नाव देशात होईल. जिल्ह्यात मेडिकल कॉलेज व्हावे, हे पाहिलेले स्वप्न पूर्ण होत असल्याचा खूप आनंद होत आहे. 
- नारायण राणे, माजी मुख्यमंत्री तथा खासदार 

संपादन - राहुल पाटील 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! कॅलिफोर्नियतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

Latest Marathi News Update : पंतप्रधान मोदी प्रचारसभेसाठी ओडिशामध्ये

Warren Buffett: गुंतवणुकीसाठी अमेरिका ही पहिली पसंती; भारताबाबत काय म्हणाले वॉरन बफे?

SCROLL FOR NEXT