Aditi Tatkare Sakal
कोकण

पाली नगरपंचायत निवडणूक; शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी नाही

पालीत बल्लाळेश्वराचे दर्शन घेऊन पाली नगरपंचायत निवडणूक प्रचाराचा नारळ बुधवारी (ता.15) वाढविण्यात आला. या निवडणुकीत शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी नाही.

अमित गवळे

पाली - पालीत बल्लाळेश्वराचे दर्शन घेऊन पाली नगरपंचायत निवडणूक (Pali Nagarpanchyat Election) प्रचाराचा नारळ बुधवारी (ता.15) वाढविण्यात आला. या निवडणुकीत शिवसेनेसोबत (Shivsena) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाची आघाडी (Aghadi) नाही. या बाबत पालकमंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी महत्वपूर्ण प्रतिपादन केले. त्या म्हणाल्या की ग्रामपंचायत, नगरपंचायत व पोटनिवडणुकीत स्थानिक परिस्थिती नुसार राजकीय समीकरण व निवडणुकीची रणनीती ठरविली जाते.

राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेना असली तरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी शिवसेना विरुद्ध शेकाप व राष्ट्रवादी अशी लढत होत आहे. यावर अदिती तटकरे म्हणाल्या की महाविकास आघाडीचे सरकार जनतेच्या सेवेसाठी अविरत काम करणारे भक्कम सरकार आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये जे मित्रपक्ष आहेत ते जनतेच्या सेवेत विकासाच्या मुद्द्यावर काम करीत आहेत. स्थानिक परिस्थिती नुसार समीकरणे वेगळी होतात.

पाली नगरपंचायत निवडणुकीत सर्वांगीण विकासकामांना प्राधान्य देणार आहोत. त्यामुळे जनतेने शेकाप व राष्ट्रवादी आघाडीला सत्तेत संधी द्यावी असे आवाहन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केले. पालीतील प्रस्तावित ग्रामीण रुग्णालय, अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकास आराखडा, शुद्ध पाणीपुरवठा योजना, शहरातील अंतर्गत रस्ते, पार्किंग व्यवस्था, भाविक व भक्तांना चांगल्या सोयीसुविधा आदी लोकाभिमुख विकास कामांना प्राधान्य देण्याची भूमिका घेऊन आम्ही निवडणूक लढवत आहोत. असे देखील तटकरे म्हणाल्या. यावेळी शेकाप माजी आमदार धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्षा गीता पालरेचा, जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष रमेश साळुंखे, युवक अध्यक्ष संदेश शेवाळे, नगरपंचायत उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Loan Waiver : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून खात्यात जमा होणार पैसे; 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, बँक खात्यांची पडताळणी सुरू

Pune Metro: आता रस्ता ओलांडणे झाले सुरक्षित! वाकड मेट्रो स्थानकावर ६० मीटरचा पादचारी पूल; नागरिकांसाठी मोफत सुविधा

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! तुमच्या बँक खात्यात 1500 ऐवजी जमा होणार 3,000 रुपये? पण 'या' 80 लाख महिलांना बसू शकतो फटका!

Wedding Destination: शोधताय? हिमालयाच्या कुशीतलं हे मंदिर बनतंय नवविवाहितांचं आवडतं ठिकाण, जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Vaibhav Sooryavanshi : वैभवसाठी संजू सॅमसनला बळीचा बकरा का बनवताय? माजी खेळाडूचा संतापजनक सवाल...

SCROLL FOR NEXT