patalganga 
कोकण

पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील मुख्य रस्ता लवकरच काँक्रीटचा

लक्ष्मण डुबे

रसायनी (रायगड) - पाताळगंगा आणि अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेऊन एमआयडीसीने मुख्य रस्ता काँक्रीटचा  बांधण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात कामाला सुरवात झाली आहे. क्षेत्रातील या रस्त्याच्या काँक्रीटीकरण झाल्यानंतर वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे. 

तीन महिन्यापुर्वी एका कंपनीला बांधकामाचा ठेका देण्यात आला होता. मात्र बांधकामाला सुरवात झाली नसल्यामुळे कारखानदांर नाराजी व्यक्त करत होते,दरम्यान सकाळने चार मार्च रोजी कारखानदरांची काम सुरू करण्या बाबतच्या मागणीची बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दख्खल एमआयडीसीने घेतली आहे. आठ मार्च रोजी रस्त्याच्या काँक्रीटीचे बांधकाम सुरू करण्याचे कंपनीला आदेश मिळाले आहे. आता पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात श्री सिध्देश्वरी ते बाँम्बे डाईन्ग लिमिटेड या मुख्य रस्त्याचे काम बीग कोला कंपनी जवळ सुरू  झाले असल्याने बाँम्ब डाईन्ग लिमिटेड कंपनीचे महाव्यावस्थापक चंद्रशेखर शेंडे आणि इतर कारखानदारांनी समाधान व्यक्त केले आहे. 

पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील श्री सिध्देश्वरी ते बाँम्बे डाईन्ग लिमिटेड या मुख्य रस्त्यावरून औद्योगिक क्षेत्रातील, क्षेत्रा बाहेरील कारखान्यात तसेच वडगाव, माझगाव, इसांबे, या ग्रामपंचायतीच्या हद्दितील गावाकडे जाणा-या आणि अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील श्री सिध्देश्वरी ते चावणे सर्कल मुख्य रस्त्यावरून औद्योगिक क्षेत्रातील आणि जांभिवली, चावणे, कराडे खुर्द या ग्रामपंचायतीच्या हद्दितील गावांकडे जाणा-या वाहनांची संख्या मागील सहा सात वर्षात खुप वाढली आहे. त्यामुळे पावसाळ्यात लवकरच या रस्त्यांवर खड्डे पडुन जाताना हाल होऊ लागले. कारखानदारांनी क्षेत्रातील मुख्य रस्ते  काँक्रीटीकरणात बांधण्यात यावा आशी मागणी केली. तसेच कारखानदारांच्या आसोशिएशने मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला आहे. दरम्यान औद्योगिक क्षेत्रातील मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरणा नंतर जाताना प्रवास सुखकारक होणार आहे. त्यामुळे कारखानदांर समाधान व्यक्त करत आहे. 

श्री सिध्देश्वरी ते बाँम्बे डाईन्ग या रस्त्याचे अंतर 1 किलोमीटर 570 मीटर आहे. तर हा चौपदरी असुन रूंदी पंधरा मीटर आहे. मध्यभागी दुभाजक आहे. तर दोन्ही बाजुला रस्त्यावरील नैसर्गिक पाणी वाहुन जाण्यासाठी गटार आहे. तसेच श्री सिध्देश्वरी ते जिंदाल कंपनी पर्यंत हा रस्ता 3 किलोमीटर 565 मीटर अंतराचा आहे. दुपदरी या रस्त्याची रूंदी साडेसात मीटर इतकी असे नियोजन आहे.
- राजेंद्र बेलगमवार, उप अभियंता, एमआयडीसी, पाताळगंगा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT