कोकण

सिंधुदुर्गात होणार पेपरलेस आर्थिक गणना

सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी - देशात होणाऱ्या राष्ट्रव्यापी 7 व्या आर्थिक गणनेमध्ये सर्व  उद्योग, व्यवसाय व सेवा यांची गणना प्रत्यक्ष घरोघरी, कुटुंब, उद्योग यांना भेट देऊन करण्यात येणार आहे. या गणनेचे काम कॉमन सर्व्हिस सेंटर यांच्यामार्फत होणार आहे. या गणनेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सातव्या आर्थिक गणनेच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे झाली. साठे यांनी जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा, नगर पालिका, पंचायत तसेच ग्रामपंचायत स्तरावरील अधिकाऱ्यांनी आर्थिक गणनेच्या कामी कॉमन सर्विस सेंटर यांना सहकार्य करण्याचे निर्देश दिले. 

जिल्हा साख्यिंकी अधिकारी यांनी सांगितले की, प्रथमच मोबाईल ॲपद्वारे आर्थिक गणना होत आहे. आर्थिक गणनेच्या क्षेत्रकामासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर यांचेकडून नेमण्यात आलेले प्रगणक प्रत्यक्ष घरोघरी, कुटुंब, उद्योग यांना भेट देऊन सर्व उद्योग, व्यवसाय व सेवा यांची गणना करणार आहेत. यावेळी कॉमन सर्व्हिस सेंटर, जिल्हा व्यवस्थापक प्रसाद जाधव यांनी आर्थिक गणना कशा प्रकारे राबविण्यात येणार आहे याचे सादरीकरण केले.

यावेळी जिल्हा सांख्यिकी अधिकारी अभिजीत कुलकर्णी, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी अँथोनी थॉमस, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक परशुराम गावडे, नगर प्रशासन अधिकारी संतोष जिरगे, विशेष निमंत्रीक सदस्य डॉ. काकडे व प्रा. सुरवसे, कॉमन सर्व्हिस सेंटरचे जिल्हा व्यवस्थापक आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाल वायरवर पाय पडला अन्.., काळाचौकीच्या गणपती मंडपासमोर अघटित घडलं; मध्यरात्री 2 वाजताचा थरारक घटनाक्रम समोर

Asian Games,Cricket: भारतीय संघाचे सलग दुसऱ्यांदा मेडल पक्के! बांगलादेशला पराभूत करत फायनलमध्ये धडक

Mohol Ganesh Mandal Youth Death : गणेश मंडळात चक्कर येऊन 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू; बेशुद्ध होऊन खाली जमिनीवर कोसळला अन्..., कार्यकर्त्यांमध्ये हळहळ

Manwat Parbhani Highway Bridge : पुलाचे काँक्रीट निखळले, सळ्याही उघड्या मानवत-परभणी राष्ट्रीय महामार्गावर प्रवासी-वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Marathi News Live Updates : 'यूपीआय'वरील शुल्काचा पुनर्विचार करा; ग्राहक पंचायतची मागणी

SCROLL FOR NEXT