passport office now not open in chiplun ratnagiri people go to mumbai 
कोकण

पासपोर्ट कार्यालय अजूनही लॉकच ; कोकणकरांना करावी लागते मुंबईवारी

राजेंद्र बाईत

राजापूर (रत्नागिरी) : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउनमध्ये येथील पोस्ट कार्यालयामध्ये दोनच वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेले पासपोर्ट कार्यालय बंद करण्यात आले. मात्र कोरोनाचा संसर्ग कमी होताच शासनाने लॉकडाउनमध्ये केलेल्या शिथिलतेमुळे अनेक शासकीय कार्यालये आणि खासगी कार्यालये सुरू झाली आहेत. मात्र पासपोर्ट कार्यालय अद्यापही लॉक आहे. त्यामुळे कोरोनानंतर विमानातून परदेशवारी करण्यास इच्छुक असणाऱ्यांच्या इच्छा-आकांक्षांसह स्वप्नांना ब्रेक लागला आहे. 

कोकणवासीयांची परदेशीवारी सुरळीत व्हावी, परदेशवारीसाठी आवश्‍यक असलेला पासपोर्ट काढण्याची सुविधा कोकणातील लोकांना स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावी म्हणून दोन वर्षापूर्वी खासदार विनायक राऊत यांनी तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडून पासपोर्ट कार्यालय मंजूर करून घेतले. त्याचा शुभारंभ दोन वर्षापूर्वी झाला. शुभारंभानंतर या पासपोर्ट कार्यालयाचा कोकणातील हजारो लोकांना फायदा होताना त्यांची परदेशवारी सुरळीत झाली तर, अनेकांचे विमानातून परदेशवारी करण्याचे स्वप्न साकार झाले.

कोरोनाच्या महामारीमध्ये दिवसागणिक कोरोनाचे संक्रमण वाढत चालले होते. ते रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउन जारी केले. त्यामध्ये खासगी उद्योगधंद्यांसह काही शासकीय कार्यालयेही बंद करण्यात आली होती. त्यामध्ये दोन वर्षापूर्वी येथील पोस्ट कार्यालयाच्या येथे सुरू करण्यात आलेले पासपोर्ट कार्यालयही बंद करण्यात आले होते. कोरोनाचे संक्रमण कमी झाल्याने शासनाने लॉकडाउनच्या नियमांमध्ये शिथिलता आणली. त्यातच, काही क्षेत्रासाठी अनलॉकही केले. 

त्यामध्ये खासगी उद्योगधंद्यांसह विविध खासगी आणि शासकीय कार्यालये सुरू झाली आहे. त्यातच, लॉकडाउनमध्ये ठप्प असलेली समाजव्यवस्था पुन्हा एकदा सुरळीतपणे सुरू झाली आहेत. मात्र, लॉकडाउनमध्ये बंद करण्यात आलेले येथील पासपोर्ट कार्यालय अद्यापही सुरू झालेले नाही. नव्याने पासपोर्ट काढणाऱ्यांसह ज्यांच्या पासपोर्टची वैधता संपल्याने नूतनीकरण करावयाचे आहे अशांची मोठी गैरसोय झाली आहे.

मुंबईवारीशिवाय पर्याय नाही

ज्यांना नवीन पासपोर्ट काढायचा आहे किंवा पूर्वीच्या पासपोर्टचे नूतनीकरण करावयाचे आहे त्यांना या कामासाठी वेळ आणि पैसा खर्च करून मुंबईवारी करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे लॉकडाउनच्या काळामध्ये बंद करण्यात आलेले पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी लोकांकडून केली जात आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VHP Garba Ban : गरब्यात मुस्लिमांना बंदी घालण्याच्या विश्व हिंदू परिषदेच्या मागणीला केंद्रीय मंत्र्यांचा विरोध; संविधानाचा दिला दाखला

'बोक्या सातबंडे' चित्रपटात पेपर विकणाऱ्या अभिनेत्याला ओळखलंत का? आज मराठीसोबतच बॉलिवूडही गाजवतोय, कोण आहे हा?

Marathi News Live Updates : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह उज्जैन ते अयोध्या पदयात्रा काढणार

Nanded News : नवसंशोधनाला मिळणार नांदेडची प्रयोगभूमी; ग्रामीण टेक्निकल कॅम्पसकडे ‘आविष्कार २०२६’ची धुरा!

Ambad News : तलावात खांदेमळणीला गाय, बैल धूण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय सौरभ नरोडेचा पाण्यात बुडून मृत्यू; धनगरपिंपरीसह परिसरात हळहळ व्यक्त

SCROLL FOR NEXT