कोकण

देवरुखात डॉक्‍टरच्या पोटात रुग्णाने खुपसली कात्री

सकाळवृत्तसेवा

देवरूख - दवाखान्यात आलेल्या रुग्णानेच डॉक्‍टरवर खुनी हल्ला करण्याची खळबळजनक घटना देवरुखात घडली. या हल्ल्यात डॉक्‍टर गंभीर जखमी झाले आहेत. रुग्णाने हल्ला करून तेथून पळ काढला. देवरूख पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यात देवरुखातील प्रतिथयश डॉक्‍टर सागर रघुनाथ फटकरे (वय ४३, रा. मधली आळी) जखमी झाले आहेत. 

याबाबत देवरूख पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. सागर यांचे शहरात श्री क्‍लिनिक आहे. आज सकाळी ११ वाजता डॉ. सागर तेथे रुग्ण तपासणीसाठी हजर होते. आलेल्या रुग्णांची तपासणी सुरू असता दुपारी साडेबाराच्या दरम्यान संदीप राठोड (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) दवाखान्यात आला होता. त्याची तपासणी झाल्यावर डॉ. सागर यांनी त्यांना तपासणीचे ८० रुपये झाले, असे सांगितले. त्यानंतर अचानक त्याने डॉक्‍टरना धक्‍काबुक्‍की करायला सुरुवात केली. त्याला प्रतिकार केल्यावर त्याने डॉक्‍टरना ठोशांनी मारहाण केली आणि त्याचवेळी ड्रेसिंग किटमधील कात्री उचलून ती डॉक्‍टरांच्या पोटात खुपसली. हा प्रकार झाल्यावर संदीप काही क्षणात दवाखान्यातून पळाला. 

खुनी हल्ल्यानंतर दवाखान्यात एकच गोंधळ उडाला. रुग्णवाहिकेने डॉ. सागर यांना देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. कात्री पोटात घुसल्याने सागर यांच्या पोटात रक्‍तस्त्राव झाला; मात्र तातडीने उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले. त्यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार संदीप विरोधात मारहाण करणे आणि खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारण अस्पष्ट, हल्लेखोर पसार
हा हल्ला नेमका कशामुळे झाला, याचे कारण समजू शकलेले नाही. तसेच हल्ला करणाऱ्या व्यक्‍तीचे नाव नेमके संदीप राठोड आहे हेसुध्दा स्पष्ट झालेले नाही. त्याने तपासणीसाठी आल्यावर नोंदवलेल्या नावाच्या आधारावर हे नाव सांगण्यात आले आहे. दरम्यान, डॉ. सागर यांचा दवाखाना शिवाजी चौकात आहे. हे वर्दळीचे ठिकाण आहे. आज सोमवार असल्याने परिसरात शुकशुकाट होता. याचा फायदा घेत संशयित पसार झाल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT