Patient Run Form Hospital Due To Fear Of Corona Positive Ratnagiri Marathi News
Patient Run Form Hospital Due To Fear Of Corona Positive Ratnagiri Marathi News  
कोकण

पॉझिटिव्हच्या भितीने रुग्ण पळाला, पण त्याचा अहवाल आला निगेटिव्ह 

सकाळवृत्तसेवा

राजापूर ( रत्नागिरी) - कोरोना विषाणुचा दिवसागणिक फैलाव वाढत असताना कोरोनाचे वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा धसका घेऊन रुग्णालयातून पळालेल्या रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला. हा प्रकार शनिवारी (ता. 3) जिल्हा रुग्णालयामध्ये घडला. जिल्हा रुग्णालयाच्या अशा कारभाराबाबत लोकांमधून तीव्र आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे. तालुक्‍यातील भू येथील रुग्णाच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. 

तालुक्‍यातील भू येथील दीपक कुंभार यांना गेल्या बुधवारी जिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले होते. त्यांचा स्वॅब घेतल्यानंतर त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असे सांगण्यात आले. तालुका प्रशासनाने तातडीने भू येथील तीन वाड्या कंटेन्मेंट झोन घोषित करून पुढील कार्यवाही सुरू केली. भू येथील व्यापाऱ्यांनीही खबरदारी म्हणून तीन दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय तातडीने घेतला. 

दरम्यान, जिल्हा रुग्णालयातून हा रुग्ण पळाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर उडालेल्या गोंधळामध्ये दीपक कुंभार याचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे सांगत जिल्हा रुग्णालयाकडून चूक झाल्याची कबुली देण्यात आली. मात्र, बेपत्ता दीपक कुंभार याची शनिवारी (ता.3) रात्री उशिरापर्यंत शोधाशोध सुरू होती. शोध सुरू असताना कुंभार रत्नागिरीतच सापडले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवले आहे. 

संतप्त ग्रामस्थांनी सोलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावून धारेवर धरले. यावेळी आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. मात्र अधिकारी निरूत्तर झाले होते. सभेला माजी सभापती अभिजित तेली, सरपंच वसंत तांबे, संजय सरफरे, डॉ. भाटये, रोहीत देव आदी उपस्थित होते. 

आम्हाला जिल्हा रुग्णालयातून दीपक कुंभार यांचे नाव अँटीजेन टेस्टच्या पॉझिटिव्ह रिपोर्टमध्ये असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यांची अँटीजेन टेस्ट झालीच नाही. त्यांची आरटीपीसीआर टेस्ट झाली त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. जिल्हा रुग्णालयात नजरचुकीने कुंभार यांचे नाव अँटीजेन पॉझिटिव्हच्या लिस्टमध्ये दाखल झाले. 
- शैलश रेवाळे, पर्यवेक्षक, सोलगाव प्राथमिक आरोग्य केंद्र 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT