pay and parking service is compulsory in ratnagiri city for solving traffic problems 
कोकण

शहरात आता 'पे ॲण्ड पार्किंग' ; पालिकेचा महत्त्वाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : शहरामध्ये वाहतूक पोलिस आणि पालिकेकडून फक्त नो पार्किंगचे बोर्ड लावले आहेत. वाहनधारकांना वाहन कुठे पार्क करावे, असे पार्किंगचे बोर्ड क्वचितच आहेत. त्यामुळे वाहनधारकांची प्रचंड गैरसोय होते. त्यात सणासुदीच्या दिवसात तर वाहनांची मोठी गर्दी होते. गाड्या लावण्यास जागा मिळत नाही. त्यामुळे उलट-सुलट वाहने लावल्याने वाहतूक कोंडी होते. वाहनधारकांना वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा सामना करावा लागतो.

पालिकेकडे पार्किंगसाठी अनेक प्लॉट आरक्षित आहेत. मात्र ते अद्याप विकसित केलेले नाहीत. लवकरच ही समस्या 
सुटणार आहे. शहरामध्ये वाहनधारकांची पार्किंगची समस्या सोडविण्याचा पालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील मारुती मंदिर येथे पे ॲण्ड पार्क विकसित केले आहे. त्यापाठोपाठ आणखी ६ ठिकाणे पे ॲण्ड पार्क विकसित केले जाणार आहे. एप्रिलपासून शहरात एकूण ७ ठिकाणी ही सुविधा सुरू केली जाईल, अशी माहिती नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी दिली. 

पालिकेने मारूती मंदिर येथे पे ॲण्ड पार्क विकसित केले आहे. त्या क्षेत्राचे उद्‌घाटन झाले. या व्यतिरिक्त प्रधान पोस्ट ऑफिस समोरच्या जागेत, साळवी स्टॉप येथे जलतरण तलावाजवळच्या मैदानात, आठवडा बाजार, लक्ष्मी चौक, पऱ्याची आळी, रामआळीतील सुपर मार्केटजवळ पे ॲण्ड पार्क विकसित केले जाणार आहे.

पालिकेतर्फे ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. दुचाकीसाठी ५ रुपये, तीन चाकीसाठी १० रुपये, कारसाठी २० रुपये, चारचाकी टेम्पोसाठी ४० रुपये आणि ट्रक, बससाठी १०० रुपये पार्किंगसाठी आकारले जाणार आहेत. हा आकार प्रति तीन तासांसाठी आहे. सध्या या सर्व जागांवर मोफत वाहने उभी केली जातात. ही वाहने अस्ताव्यस्त पार्किंग केलेली असतात. पे ॲण्ड पार्कमुळे वाहनधारकांना शिस्त लागणार आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT