Peasants and Workers Party of India political existence dominating cooperative sector Raigad politics sakal
कोकण

Raigad Politics News : शेकापच्या अस्तित्वाला घरघर; रायगड जिल्ह्यातील ताकद संपण्याच्या मार्गावर; पक्षाला गळती

रायगड जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर वर्चस्व ठेवून राजकीय अस्तित्व टिकवण्याची धडपड सुरू

सकाळ वृत्तसेवा

पनवेल, अलिबाग : शेकापचे माजी आमदार विवेक पाटील (Vivek Patil)यांच्या राजकीय संन्यासाच्या निर्णयामुळे राज्यातील राजकारणातील एक लोकप्रिय चेहरा गायब झाला आहे. पाटील यांच्या निर्णयामुळे मोठी निवडणूक लढवण्यासाठी सध्याच्या घडीला शेकापकडे काही मोजकेच नेते उरले आहेत.

या नेत्यांच्या मदतीने किमान जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवण्याची रणनीती सरचिटणीस आमदार जयंत पाटील आखत होते; परंतु सध्याची राजकीय परिस्थिती पाहता पक्षाला लागलेल्या गळतीमुळे रायगड जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर वर्चस्व ठेवून राजकीय अस्तित्व टिकवण्याची धडपड सुरू आहे.

रायगडच्या राजकारणात नेहमी किंगमेकरची भूमिका बजावणारा शेतकरी कामगार पक्षाची अवस्था आता नेतृत्व नसणारा पक्ष अशी झाली आहे. अलीकडेच पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील, अलिबागचे दिलीप भोईर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असताना आता उरणचे माजी आमदार विवेक पाटील यांनी राजकीय संन्यास घेतला आहे.

त्यामुळे पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्याबरोबर माजी आमदार सुभाष (पंडित) पाटील, बाळाराम पाटील, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अॅड. आस्वाद पाटील, चित्रा पाटील, प्रीतम म्हात्रे, चित्रलेखा पाटील, संतोष जंगम अशी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच नेतेमंडळी शेतकरी कामगार पक्षाकडे उरली आहेत.

याचा परिणाम जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीत सत्तेत राहण्याचे सातत्य शेकापने आतापर्यंत कायम राखले आहे.

यासाठी त्यांनी कधी राष्ट्रवादीबरोबर, तर कधी कॉंग्रेस, शिवसेनेबरोबर युती करत जिल्हा परिषदेची सत्ता कायम ठेवली.

फक्त रायगडमध्ये अस्तित्व राहिलेल्या शेकापकडून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी जिल्हा परिषद निवडणुका लढवण्याची रणनीती आखली जात होती; परंतु सध्याच्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादीचा अजित पवार गट, शिवसेनेचा शिंदे गट या मविआमधून बाहेर पडल्याने शेकापला पुन्हा राजकीय गणिते जुळवावी लागणार आहेत.

पनवेल-उरणमध्ये वाताहत

एकेकाळी पनवेल नगर परिषदेवर एकहाती सत्ता असणाऱ्या शेकापची महापालिकेत फार वाईट अवस्था आहे. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी शेकापला सोडचिठ्ठी दिल्यानंतर पक्षाला पनवेल आणि उरणमध्ये उतरती कळा लागली. सत्तेतील पक्ष आता पनवेल महापालिकेत विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे.

विरोधी पक्षात असतानाही शेकापच्या निम्म्या नगरसेवकांनी भाजपची वाट धरली आहे. शेकापची नेहमी ताकद राहिलेल्या पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतीही हळूहळू भाजपच्या ताब्यात जाऊ लागल्या आहेत. आगामी काळात रायगड जिल्हा परिषदेवरची ताकद अबाधित ठेवण्यासाठी शेकापला कडवी झुंज देण्यासारखे नेते शिल्लक राहिलेले नाहीत.

शेकापचे बलस्थान

मोठ्या निवडणुकीसाठी नेते नसले तरी शेकापने सहकार क्षेत्राच्या माध्यमातून तळागाळातील आपली पकड कायम ठेवलेली आहे. छोट्या कार्यकर्त्यांच्या मदतीने जिल्ह्यातील ग्रामपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समित्या, मजूर सहकारी संस्था, पतसंस्थांसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका ताब्यात आहेत.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची १५ जुलै रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत विरोधी पक्षाला एकही जागा मिळवून देणार नाही.

- जयंत पाटील, सरचिटणीस, शेकाप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT