पेडणे : राज्य उत्पादन खात्याच्या पथकाची खासगी मोटार फोडली  sakal
कोकण

पेडणे : राज्य उत्पादन खात्याच्या पथकाची खासगी मोटार फोडली

सकाळ वृत्तसेवा

बांदा : गोव्यातील पेडणे तालुक्यात सरंबळ येथे काल (ता.१९) रात्री १ वाजण्याच्या सुमारास खासगी वाहनातून कारवाई करण्यास गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई भरारी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर स्थानिकांकडून चोर-लुटेरे समजून प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये दोघे कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत पेडणे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्हा उत्पादन शुल्क खात्याचे वरिष्ठ अधिकारी गोव्यात दाखल झाले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबई येथील भरारी पथक गोवा हद्दीत कारवाई करण्यासाठी गेले होते. रात्री उशिराची वेळ असल्याने पथक खासगी वाहनातून गेले होते. या घटनेत उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ यांच्यात बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसान पुढे हाणामारीत झाल्याने दोन कर्मचारी गंभीर जखमी झालेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मुंबई येथील भरारी पथक काल रात्री कारवाई करण्यासाठी पेडणे तालुक्यात दाखल झाले; मात्र त्यांच्यासोबत खासगी वाहन असल्याने व चौकशी करत असल्याने स्थानिकांना चोर किंवा लुटेरे असल्याचा संशय आला.

ग्रामस्थांनी पथकातील कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र मागितले; मात्र कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र न दाखविल्याने जोरदार बाचाबाची झाली. ग्रामस्थांनी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचा काळोखात चोप काढला. पथकासोबत असलेल्या खासगी मोटारीची काच देखील फोडण्यात आली. या झटापटीत दोन कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत झाली. यातील एका गंभीर कर्मचाऱ्यावर गोवा-बांबोळी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसऱ्या गंभीर जखमी झालेल्या कर्मचाऱ्याला अधिक उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत पेडणे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयन्त केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पावसात वाघोली ठप्प! पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनचालकांची मोठी गैरसोय

SIP Investment: दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 1 कोटी कधी होतील? पाहा सोपं गणित

Pune Traffic Jam : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी तीव्र वाहतूक कोंडी; वाढलेल्या वाहनांमुळे मध्यवर्ती भाग व उपनगर ठप्प

IND vs ENG 2nd T20I Pitch Report: दुसऱ्या टी-20मध्ये फलंदाजांचा बोलबाला की गोलंदाजांची कमाल? जाणून घ्या Pitch Report

Latest Marathi Live Update : मुंबईत ताज हॉटेलसमोरचं मोठं झाड कोसळलं, गाडीचं नुकसान

SCROLL FOR NEXT