Percentage Of Army Soldier Decreased In Konkan Ratnagiri Marathi News  
कोकण

पूर्वी सैन्य दलात 100 पैकी 40 कोकणी असायचे; पण आता....

मुझफ्फर खान

चिपळूण ( रत्नागिरी ) -  भारताच्या सैन्यदलात कोकणातील तरुणांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. सैन्य दलात कार्यरत असलेल्या सैनिकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर राष्ट्रवादाची भावना व्यक्त करणारा तरूण मात्र सैन्य दलातील भरतीकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे. 

कित्येक महिने प्रचंड मेहनत घेऊन रक्ताचे पाणी करून तरूण सैन्यात भरती व्हायचे. निवड झाल्यानंतर त्यांचे गावोगावी सत्कारही व्हायचे. सैन्यात रुजू होण्यासाठी मुंबईतून तारीख मिळाली की आनंदाने त्यांना सोडण्यासाठी गावातील लोक मुंबईपर्यंत जायचे. गावोगावी आजही हा सन्मान सैनिकांना दिला जातो.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो तरुणांनी सैन्यात आपले योगदान दिले आहे. सैन्यातील मराठा रेजिमेंटमध्ये कोकणातील तरूणांची संख्या सर्वाधिक होती. खेड तालुक्‍यातील तिसंगी, मोरवणे, धामणंद, शिवथर ही गावे सैनिकांची गावे म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर नव्याने भरती होणाऱ्यांचे प्रमाण अत्यंत कमी झाले. 

खडपोली (ता. चिपळूण) येथील दीपक कोकरे हे भारताच्या सैन्य दलात लखनऊ (उत्तर प्रदेश) येथे स्पेशल बॉम्ब स्कॉडमध्ये कार्यरत आहेत. ते म्हणाले, सैन्य दलात 100 पैकी 40 जवान पूर्वी कोकणातील होते. नव्याने भरती होणाऱ्यांचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे ही संख्या कमी झाली आहे. शंभरातील 20 ते 25 तरुण आता कोकणातील भरती होतात. हा टक्का वाढला पाहिजे.

सद्यस्थितीत पश्‍चिम महाराष्ट्रातील तरुणांची सैन्य दलात सर्वाधिक संख्या आहे. सरकारकडून नेहमीप्रमाणे सैन्य भरती केली जाते. ही भरती अत्यंत पारदर्शकपणे होते. कोकणातील तरुणांना भरतीबाबत योग्य प्रशिक्षण मिळत नाही. अनेकवेळा मार्गदर्शनाअभावी तरुण या भरतीकडे फिरकत नाहीत. भरतीसाठी आपला प्रदेश सोडून इतर भागात जात नाहीत. मात्र पश्‍चिम महाराष्ट्रातील तरुण सैन्य भरतीसाठी कोणत्याही प्रदेशात जाण्यास तयार होतात. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील तरुणांची संख्या वाढत आहे. 

एक पदांमध्ये केवळ 24 तरुण कोकणातील 
13 ते 23 डिसेंबर 2019 दरम्यान नाशिक, ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर व उपनगर भागात 1 हजार पदांसाठी भरती झाली. 11 फेब्रुवारी 2020 ला त्यांची अंतिम निवड करण्यात आली. यात केवळ 24 तरुण कोकणातील आहेत.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Gaikwad Reaction : शेतकरी संकटात अन् मंत्री फुलांवरून चालले; संजय गायकवाडांचा शिरसाटांना घरचा आहेर

Sangli Water Restriction:धरणे तुडुंब भरलेली असताना उपसाबंदी कशासाठी? राजू शेट्टींचा शासनावर हल्लाबोल : सांगली-कोल्हापुरात पहिल्यांदाच निर्णय

Thailand Ganeshotsav : ढोल-ताशांचा गजर, भक्तिगीते अन् गणेश विसर्जन मिरवणूक; बँकॉकमध्ये रंगला गणेशोत्सव

Marathi News Live Updates : बदलापुरात बसची दुचाकीला धडक दुचाकीवरील तरुणीचा मृत्यू, तरुण गंभीर जखमी

लालबागच्या राजाच्या चरणांचं कुंकू पत्नीच्या भांगेत भरलं अन्...; संजय दत्तचा Viral Video, नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT