photographer Sanjeev Salvi  story in konkan ratnagiri
photographer Sanjeev Salvi story in konkan ratnagiri 
कोकण

‘मै अकेला हूं, किसी स्टेशनपर न रुकनेवाली पकडी है ट्रेन!’ त्यांची एक्झिट चटका लावणारी....

मकरंद पटवर्धन

रत्नागिरी :  जिंदगी... ‘जिस ट्रेन की कोई मंजिल नही, जो किसी स्टेशनपर रुकती नही। शायद ऐसीही ट्रेन पकडी हैं मैने, पर इसमे कोई मुसाफिर नही, मै अकेला हूं। ही कविता आहे, छायाचित्रकार संजीव साळवी यांची. मात्र लॉकडाऊनच्या काळात ‘कसक’ दि पोएट्री या यूट्यूब चॅनेलवर 25 जूनला झळकलेली ही त्यांची शेवटची कविता ठरली. कोरोना व हृदयविकाराच्या झटक्याने सर्वांच्या लाडक्या संजूने आज सकाळी चटका लावणारी एक्झिट घेतली.


सतत काहीतरी नवीन शोधणार्‍या संजू साळवी यांच्या निधनाने हरहुन्नरी व्यक्तीमत्वाला रत्नागिरीकर मुकले आहेत. उत्कृष्ट छायाचित्रकार, फक्त अद्ययावत कॅमेरा घेऊन नाही तर अँगलचा बादशहा आणि हास्यसम्राटमध्ये मुशाफिरी, कविता, गोव्यात फॅशन शो आयोजित करून रत्नागिरीची छाप पाडणारा अवलिया म्हणून संजू सुपरिचित. लॉकडाऊनपूर्वी गोव्यातून येथे आलेल्या साळवी यांनी ‘कसक’ हे यूट्यूब चॅनेल सुरू केले. त्यावर 21 मे पासून स्वरचित पण बरेच काही बोलून जाणार्‍या कविता रसिकांना मिळाल्या. 25 जूनला ‘जिंदगी’ या कवितेने तर त्यांची काव्यप्रतिभा प्रगल्भ असल्याचे दिसून आले. ते कॉलेज जीवनात ऑर्केस्ट्रामधून गीतगायन व मिमिक्री करत.

फॅशन फोटोग्राफी व मेकअपच्या दुनियेत खासियत


ब्लॅक अँड व्हाइट फोटोग्राफीचे जादूगार वडील हरिश्‍चंद्र साळवी यांच्या पावलावर पाऊल टाकून संजू साळवी फोटोग्राफी करू लागले. सुरवातीला आठवडा बाजार परिसरात मेमरीज फोटो स्टुडिओ चालवला. फॅशन फोटोग्राफी व मेकअपच्या दुनियेत त्यांची खासियत होती. चार-पाच वर्षांपूर्वी माळनाका येथे पॅरिसन स्टुडिओतून सामान्य चेहेर्‍यांना रूबाबदार बनवण्याचे ‘मेकओव्हर’ केले. चित्रपट, मालिका इंडस्ट्रीजमध्ये युवा कलाकारांना चमकवण्यासाठी संधी दिली. गोव्यामध्ये राष्ट्रीय पर्सनॅलिटी कॉन्टेस्टला परीक्षक म्हणूनही काम पाहिले. गोव्यामध्ये मॉडेलिंग फोटोग्राफीची चार प्रदर्शने केली. एका प्रदर्शनाचे उद्घाटन व मॉडेल कॅलेंडर्सचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले होते.

लवकर येतोय आपल्यात..
साळवी यांच्या निधनाची सकाळी बातमी समजल्याने सर्व छायाचित्रकारांनी आपापले स्टुडिओ बंद ठेवून आदरांजली वाहिली. रुग्णालयातून साळवी यांचा अनेक मित्रांशी संपर्क होत होता. बरा होऊन लवकर येतोय आपल्यात असा संदेशही त्यांनी काल पाठवला होता. पण आज अचानक निधनामुळे फोटोग्राफी क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

छायाचित्रकार विसरू शकत नाही...

“संजूला कलेविषयी आदर होता. तो नवनवीन काही करायचा. छायाचित्रकार बंधूंसाठी तो हसतखेळत वर्कशॉप घ्यायचा. अनेक नवीन छायाचित्रकारांना त्याने स्वतःच्या पायावर उभे केले, हे प्रत्येक छायाचित्रकार विसरू शकत नाही.”
- अजय बाष्टे, अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर संघटना

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT