Pisuri Deer  sakal
कोकण

Pisuri Deer : माणगाव पेठेत भर वस्तीत आढळले अतिशय दुर्मिळ पिसोरी हरीण

सकाळ डिजिटल टीम, अमित गवळे - सकाळ वृत्तसेवा

Pisori Deer : रायगड जिल्ह्यातील माणगाव शहरातील बाजारपेठ भर वस्तीत एक अतिशय दुर्मिळ पिसोरी हरीण पहायला मिळाले. या हरणाला येथील वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांच्यासह वनविभागामार्फत बुधवारी (ता.26) सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, माणगाव बाजारपेठेतील व्यापारी कृष्णाभाई गांधी यांच्या दगडी बिल्डिंग मागील गजबजलेल्या परिसरात मंगळवारी (ता.25) छोट्या हरीणासारखा प्राणी दिसत असल्याचे त्यांनी माणगावचे वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांना फोनवरून कळविले. तात्काळ शंतनु व त्यांचे सहकारी मित्र शुभांकर वनारसे यांनी प्रत्यक्ष ठिकाणी दाखल होत पाहणी केली व वन विभागाला देखील माहिती दिली, वनविभागाची टीम देखील बोलावण्यात आली परंतु हा परिसर खूप मोठा असल्याने या छोट्याश्या प्राण्याचा शोध घेणे शक्य नव्हते.

तरीसुद्धा शंतनु व टीमने परिसर पिंजून काढला मात्र प्राणी कुठेही दिसला नाही, स्थानिकांमध्ये जनजागृती करून हा प्राणी पुन्हा दिसल्यास जवळ न जाता त्वरित कळविण्याचे आवाहन करत वनरक्षक व शंतनु त्या ठिकाणाहून परतले. लगेच दुसऱ्याच दिवशी बुधवार दिनांक २६ जुलै रोजी सकाळी ७ वाजता पुन्हा हा प्राणी या ठिकाणी आला असल्याची माहिती कृष्णाभाई गांधी यांनी दिली, तातडीने शंतनू व त्याचा सहकारी मित्र शुभांकर तेथे पोहोचले, पाहणी केली असता हा प्राणी "माउस डियर" म्हणजेच मराठीत "मूषक हरीण" किंवा "पिसोरी" म्हणून ओळखेल जाणारे हरीण असल्याचे खात्रीपूर्वक कळले. चारी दिशेने लोकवस्तीने गजबजलेल्या बाजारपेठ परिसरात हे अत्यंत लाजरे हरीण पुराच्या पाण्यामुळे चुकून अडकून राहिले असल्याचे निदर्शनास आले व आजूबाजूला भटक्या कुत्र्यांचा मोठा वावर आणि समोरील मुंबई-गोवा महामार्ग त्यामुळे हरिणाचा तात्काळ बचाव करणे गरजेचे असल्याने स्थानिक व गांधी परिवाराच्या मदतीनेच बचावकार्य सुरु करण्यात आले.

बचावकार्यादरम्यान हे पिसोरी हरीण चक्क बाजारपेठेतील प्रजापती यांच्या राजश्री एम्पोरियम या कपड्यांच्या दुकानात शिरले, तिथे वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांनी अथक प्रयत्नांनंतर हळुवारपणे पकडून वनविभागाची टीम दाखल होईपर्यंत साधारण १५ मिनिटे दुकानाच्या बंद खोलीत हरिणाला शांत ठेवले.

माणगांव वनपरिक्षेत्र अधिकारी अनिरुद्ध ढगे देखील वनरक्षक वैशाली भोर,अनिल मोरे आणि वाहन चालक विवेक जाधव अश्या आपल्या टीम सोबत तात्काळ पिंजरा घेऊन पिसोरी हरीणाच्या सुखरूप बचावासाठी पोहोचले, हरिणाला दुकानातून पिंजऱ्यात सुरक्षितपणे ठेऊन लगेचच माणगांव पशुवैद्यकीय दवाखान्यात चाचणीसाठी नेह्ण्यात आले. पिसोरी हरीण संपूर्णपणे तंदुरुस्त असल्याची खात्री करून वनविभागामार्फत योग्य त्या नोंदी व काळजी घेत साधारण ४ किलो इतक्या वजनाच्या पूर्ण वाढीच्या या मादी पिसोरी हरीणास जवळच्याच नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.

सदरचे बचावकार्य रोहा उप वनसंरक्षक अप्पासाहेब निकत व सहाय्यक वनसंरक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांवचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिदुद्ध ढगे, वनरक्षक अनिल मोरे आणि वैशाली भोर, वाहन चालक विवेक जाधव, वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर आणि सहकारी मित्र शुभंकर वनारसे व स्थानिकांच्या मदतीने करण्यात आले.

अतिशय दुर्मिळ

मूषक हरीण म्हणजेच पिसोरी हरीण हा अतिशय दुर्मिळ लाजरा व नेहमीच मनुष्यवस्तीपासून दूर जंगलात राहणारा वन्यजीव आहे, वेळप्रसंगी खूप चपळतेने हे हरीण पळते. अधिवासात सोडताना पिंजऱ्याचे दार उघडताच मोकळा श्वास घेत पिसोरी हरीण आपल्या मार्गाने जंगलाच्या दिशेने निघून जातानाचे दृश्य काही वेगळेच समाधानकारक होते. माणगांव बाजारपेठेतल्या जागृत स्थानिक रहिवाश्यांमुळे आणि गांधी परिवारामुळे हे शक्य झाले, एका अतिदुर्मिळ अश्या हरीणाचे प्राण वाचून पुन्हा नैसर्गिक अधिवासात ते सुरक्षितपणे मुक्त झाल्याचे शंतनू कुवेसकर यांनी सांगितले आहे.

सद्याच्या पूरपरिस्थितीमुळेच वन्यजीवांची देखील वाताहत होत आहे, भर वस्त्यांमधून त्यांचा वावर आढळून येतोय. माणगांव शहरातल्या मोठ्या मगरीच्या बचावानंतर आता लगेचच हे पिसोरी हरीण बाजारपेठेत मिळाले आहे, स्थानिक नागरिकांनी अश्या प्रकारेच सहकार्य करीत वनविभागाला त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन पुन्हा एकदा वनपरिक्षेत्र अधिकारी अनिरुद्ध ढगे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Special Envoy Sergio Gor: ट्रम्प यांचे विशेष दूत सर्जियो गोर यांचं मोठं विधान म्हणाले, ''भारत आमचा धोरणात्मक भागीदार अन्... ''

IND vs WI Test Series: केएल राहुलकडे कसोटी संघाचे नेतृत्व, श्रेयस अय्यरचे पुनरागमन; वेस्ट इंडिजविरुद्ध अशी असेल टीम इंडिया

Modem Balakrishna : कोण होता मॉडेम बालकृष्ण? तब्बल एक कोटींचा होता इनाम, खात्मा झाल्याने नक्षलवाद्यांना मोठा झटका

Pune News : तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला मरेपर्यंत जन्मठेप

Nepal Protests : नेपाळमधील आंदोलनानंतर विमानसेवा सुरू, पर्यटकांचा मायदेशी परतीचा प्रवास

SCROLL FOR NEXT