कोकण

- देवरूख नगरपंचायतीतर्फे वृक्ष लागवड

CD

- rat६p५.jpg-
P२४M८८३१८
देवरूख नगरपंचायतीने घेतली वृक्षसंवर्धनाची शपथ.

देवरूख नगरपंचायतीतर्फे वृक्ष लागवड

सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. ६ : जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने देवरूख नगरपंचायतीतर्फे नगरपंचायत कार्यालयाच्या मोकळ्या जागेत वृक्षारोपण मोहिमेचे उद्घाटन प्रशासक तथा मुख्याधिकारी चेतन विसपुते यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले.
सर्वत्र होणारी वृक्षतोड, त्या बदल्यात न होणारी लागवड याचा परिणाम वातावरणावर होत आहे. दरवर्षी उष्णतेत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे पावसाळ्यात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याच्या सूचना शासनस्तरावरून केल्या जात आहेत. दरवर्षी नगरपंचायतीच्या माध्यमातून जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून झाडे लावली जातात. यावर्षी अधिकाधिक झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प मुख्याधिकारी चेतन विसपुते यांनी केला असून, तशा सूचना त्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या आहेत.
जागतिक पर्यावरणदिनानिमित्ताने नगरपंचायतीतर्फे नगरपंचायत कार्यालयाच्या मोकळ्या जागेत वृक्षारोपण व संवर्धन मोहिमेचा आरंभ झाला. माझी वसुंधरा शपथ घेण्यात आली. देवरूख नगरपंचायतीतर्फे शहरातील बचतगटांना वृक्ष लागवडीकरिता उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या वेळी परिविक्षाधीन मुख्याधिकारी नेहा कंठे, प्रशासकीय अधिकारी अनघा भाटकर, आरोग्य विभागप्रमुख प्रवीण खरात तसेच सर्व अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khambatki Ghat Traffic Jam : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा; टँकर आडवा झाल्याने मोठी वाहतूक कोंडी

Drishyam 3 Twitter review: कसा आहे अजय, तब्बूचा 'दृश्यम ३: द कन्क्लूजन'? ट्विटरवर नेटकऱ्यांनी खरं खरं सांगितलं; म्हणतात-

'मी, भारताचा कर्णधार होण्याचे स्वप्न पाहिले नव्हते'; शुभमन गिल असं का म्हणाला? वन डे वर्ल्ड कपबाबत मोठं विधान, रोहित, विराट...

Latest Marathi News Live Update : सीजेपीच्या मुंबईतील आंदोलनाला स्थानिकांचा विरोध

Solapur Auto Fare Hike : रिक्षांचा प्रवास सोलापुरात ९ ऑक्टोबरपासून महागणार रात्री २५ ते ४० टक्के अतिरिक्त भाडे; मीटर कॅलिब्रेशनसाठी ८ डिसेंबरची मुदत

SCROLL FOR NEXT