poladpur accident of yesterday the story of dhanagarwada people in rantagiri khed
poladpur accident of yesterday the story of dhanagarwada people in rantagiri khed 
कोकण

दादा, माझी दोन मुलं आणि नवरा त्या टेम्पोत होते ; सनईच्या सुरानंतर घडलेल्या घटनेने अख्ख्या गावावर पसरली शोककळा

सिद्धेश परशेट्ये

खेड (रत्नागिरी) : खेड तालुक्‍याच्या दुर्गम भागात वसलेल्या खवटीच्या धनगरवाड्यावर गेल्या दोन दिवसांपूर्वी सनईचे मंजुळ स्वर ऐकू येत होते, परंतु शुक्रवारी (ता.८) रोजी झालेल्या अपघाताने येथे शोकाकुल आक्रंदन सुरू होते. सारा परिसर हादरून गेला आहे. शहराशी फारसा संपर्क नसलेली ही वस्ती, डोंगराच्या कडेकपारीत राहून शेती आणि दुग्धव्यवसाय करणारी ही मंडळी या धक्‍क्‍याने हादरूनच गेली आहेत. 

धनगरवाड्यावरील तरुणाच्या विवाहासाठी वऱ्हाड पोलादपूर तालुक्‍यातील कोंडशी-कुमठे गावी गेली होती. विवाह उरकून नवदाम्पत्याला शुभआशीर्वाद देऊन मंडळी शुक्रवारी (८) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास खेड-खवटीला निघाली. कुडपण मार्गावरील क्षेत्रफळ या अरुंद आणि अवघड वळणावर टेम्पो चालकाचा ताबा सुटला. टेम्पो रस्त्याच्या डाव्या बाजूला दोनशे फूट खोल दरीत कोसळला. अपघातात तिघे मृत्युमुखी पडले तर ४९ जखमी झाले.

शहरापासून कोसो दूरू असलेल्या धनगरवाड्यावर ही घटना रात्री साडेआठच्या सुमारास समजली. त्यामुळे लग्नासाठी गेलेल्या अनेकांच्या घरातील मंडळीचा जीव त्यांच्या काळजीने टांगणीला लागला. अपघातग्रस्तांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. काहींना अलिबाग येथे हलविण्यात आले, तर प्राथमिक उपचार करून काहींना कळंबणी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती धनगरवाड्यांवर रात्री समजली. 

अपघातग्रस्तांचे नातेवाईक सैरभैर

सकाळीच अपघातग्रस्तांचे नातेवाईक खवटी धनगरवाड्याच्या वेशीवरील बसथांब्यावर एसटी बसची वाट पाहत बसून होते. या दुर्गम भागात दिवसातून एसटीच्या फक्त दोनच फेऱ्या होतात. धनगरवाड्याच्या वेशीपासून पुढील प्रवास पायी करावा लागतो. 

माहिती मिळाली, पण गाडी नाही

दादा काल रात्री अपघाताची माहिती मिळाली. जीव कासावीस झाला आहे. माझे दोन मुलगे आणि नवरा त्या टेम्पोमध्ये होते. फक्त नवऱ्याला थोडेफार लागले. मुका मार अधिक बसल्यामुळे त्यांना सहन होत नाही, अशी माहिती रात्री नंदा यशवंत ढेबे यांनी फोनवरून दिली. हुंदका आवरतच या अपघातानंतरचे चित्रच उभे करताना त्या म्हणाल्या, ‘अपघाताची माहिती मिळाली, पण गाडी नाही. इतर साधन नाही. मी त्यांना बघायलाही जाऊ शकले नाही. म्हणून सकाळपासून एसटीकडे डोळे लावून बसले आहे.’

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

SCROLL FOR NEXT