Congress NCP Shivsena
Congress NCP Shivsena esakal
कोकण

महाआघाडीची राजकीय गणित बदलली; शिवसेनेच्या आमदाराला बसणार धक्का?

सकाळ वृत्तसेवा

बदललेल्या या समीकरणांचा विद्यमान आमदारांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

मंडणगड : राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यातील आघाडीच्या घोषणेमुळे मंडणगड नगरपंचायतीच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे. याचा तालुक्याच्या राजकारणावरही मोठा परिणाम होणार असल्याचे संकेत आहेत. बदललेल्या या समीकरणांचा विद्यमान आमदारांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत मनसे व भाजप स्वतंत्र लढणार असून, रिपाई आठवले गटाची भूमिका स्पष्ट झालेली नाही.

आमदार कदम गेल्या वर्षभरापासून मंडणगड नगरपंचायतीसाठी तयारी करीत आहेत. त्यांनी जवळ जवळ सर्वच प्रभागांत आपले उमेदवार तयार केले. मात्र, नव्या गणिताने शिवसेना-राष्ट्रवादीच्या युतीमुळे निवडणुकांची सर्व जबाबदारी गेल्या काही वर्षांपासून ज्येष्ठ म्हणून गणल्या गेलेल्या शिवसेनेच्या गटाकडे गेली आहेत. त्यामुळे आमदार कदम कोणती भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे.

राष्ट्रवादी व शिवसेना या कट्टर प्रतिस्पर्ध्यांच्या निवडणुकीतील आघाडीमुळे ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे आमदार योगेश कदमांच्या विरोधातील गटाकडे या निवडणुकीचे नेतृत्व गेल्याने रंगत येणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम यांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला.

एबी फॉर्मवरून हमरीतुमरी

मंडणगड नगरपंचायतीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेतील कलह पुन्हा एकदा उफाळून आला. निमित्त होते एबी फॉमचे. गेल्या चार दिवसांपासून शिवसेनेच्या कुठल्या गटातील उमेदवारास एबी फॉर्म मिळणार, अशी चर्चा रंगली होती. या चर्चेला पूर्णविराम मिळत असताना नगरपंचायतीच्या कार्यालयातील परिसरात शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये एबी फॉर्म वाटप व उमदेवारांची निवड यावरून हमरीतुमरी झाली.

कॉंग्रेसची भूमिका अस्पष्ट

महाविकास आघाडीतील काँग्रेसची भूमिका या निवडणुकीत अद्याप स्पष्ट झालेली नाही. काँग्रेस महाआघाडीसोबत जाणार आहे की नाही, याविषयी भाष्य पक्ष पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेले नाही. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे पाच नगरसेवक निवडून आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: लाल किल्ल्यावरून सांगतो त्यांची प्रतिष्ठा वाढलीच पाहिजे.. अदानी अंबानीवर विचारलेल्या प्रश्नावर मोदींचे छातीठोक उत्तर

Chandu Champion : प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी रिलीज होणार 'चंदू चॅम्पियन'चा ट्रेलर; चित्रपटातील 'त्या' सीनचं सिक्रेट कार्तिकने केलं उघड

Instagram Post Delete : इंस्टाग्रामच्या पोस्ट एकावेळेस एका क्लिकमध्ये डिलीट करायच्या आहेत? फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स

Sangli Crime : गुंगीचे औषध देऊन कॅफेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; 'शिवप्रतिष्ठान'कडून कॅफेची तोडफोड

Latest Marathi News Live Update : गिरीश महाजन छगन भुजबळ यांच्या भेटीला भुजबळ फॉर्मवर दाखल

SCROLL FOR NEXT