Police action against youths who went to the waterfall 
कोकण

लाॅकडाउनमध्ये धबधब्यावर जाणं पडल महागात

सकाळ वृत्तसेवा

मालवण (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील घुमडे गावातील वत व काजरकोंड येथे धबधब्यांच्या ठिकाणी पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यास आलेल्या अनेक तरुणांवर पोलिसांनी कडक कारवाई केली. पोलिसांची चाहूल लागताच अनेकांनी तेथून पळ काढला; मात्र जे तरुण सापडले त्यांना पोलिस ठाण्यात पाचारण केले आहे. 

कोरोना लॉकडाउनच्या काळात नागरिकांनी गर्दी टाळावी, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. सध्या पावसाळा सुरू झाल्याने अनेक तरुणांनी आपला मोर्चा पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी ग्रामीण भागातील धबधब्यांच्या ठिकाणी वळविला आहे. त्यामुळे अशा धबधब्यांच्या ठिकाणी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. अशा गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यताही जास्त आहे.

यात आज दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घुमडे वत, काजरकोंड येथी धबधब्याच्या ठिकाणी तरुणांनी गर्दी केली असल्याची माहिती पोलिसांना मिळताच येथील पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी हेमंत पेडणेकर, आशिष कदम, रमेश तावडे, घुमडे सरपंच दिलीप बिरमोळे, पोलिसपाटील प्रशांत बिरमोळे यांनी घटनास्थळी अचानक धडक दिली. पोलिस आल्याचे दिसतच अनेकांनी तेथून पळ काढला तर काही तरुण पोलिसांना सापडले. या तरुणांना पोलिस ठाण्यात बोलाविण्यात आले आहे.

पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यास ग्रामीण भागात हौशी तरुणांची गर्दी होत असल्याने पोलिसांनी ग्रामीण भागातील पर्यटन स्थळांवर करडी नजर ठेवण्यास सुरवात केली आहे. यापुढेही ग्रामीण भागात अशी धडक कारवाई मोहीम सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Latest Marathi News Updates : पुण्यात पुढचे ३ तास धोक्याचे, मुसळधार पावसाची शक्यता

Chandrapur News : पतीचं दुखणं बरं होईना, जमापुंजीही संपली; बिल कसं भरायचं? पैसे नसल्यानं पत्नीनं रुग्णालयातच संपवलं जीवन

Solapur News: 'बेपत्ता रिक्षाचालकाचा ‘सीडीआर’वरून शोध'; दुसऱ्या दिवशीही सापडला नाही, जुना पूना नाका ते देगाव ब्रीजपर्यंत शोधले

Solapur Rain : कोरड्याठक सीना नदीला २५ वर्षांत पहिल्यांदाच भयंकर पूर, १० गावे पाण्याखाली, हजारो नागरिकांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT