police action in banda kokan martahi news 
कोकण

अबब ! एवढ्या रुपयांची दारु जप्त.....

सकाळ वृत्तसेवा

बांदा (सिंधुदुर्ग) : राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या भरारी पथकाने शहरातील पिंपळेश्वर मंदिर नजीक बेकायदा दारू वाहतूक कसरणाऱ्या मोटारिवर कारवाई करत एकूण ५ लाख २१ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दारू वाहतूक प्रकरणी सुजित विजय तिळवे याला ताब्यात घेण्यात आले.ही कारवाई काल मंगळवारी रात्री उशिरा करण्यात आली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की 

पत्रादेवी-गोवा येथून बांद्याच्या दिशेने मोटारीतून बेकायदा गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय खबर भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार शहरातही पिंपळेश्वर मंदिर नजीक सापळा रचण्यात आला होता.रात्री उशिरा याठिकाणी मारुती सुझुकी स्विफ्ट मोटार (एमएच ०७ क्यू ५७१६) तपासणीसाठी थांबविण्यात आली. मोटारीच्या मागील सीटवर व पाठीमागील डिकीत गोवा बनावटीच्या दारूचे बेकायदा खोके आढळले.

पथकाने गोवा बनावटीच्या मॅक्डोल नंबर १ व्हिस्की, कमांडर थ्री एक्स रम, डॉक्टर ब्रॅण्डिं, नॅशनल रॉयल ब्रँड, किंग फिशर बियर या दारूचे ५५ खोके व मोटार जप्त केली.प्राथमिक तपासात तिळवे याने सदरचा दारुसाठा हा प्रकाश पाटील यांचा असल्याचे सांगितले. तसेच गोवा येथील आर्यन हॉटेलमध्ये अज्ञात इसमाने दारूचे खोके दिल्याचे सांगितले. याप्रकरणी पाटील व अज्ञात इसम यांना फरार घोषित करण्यात आले आहे. अधिक तपास निरीक्षक दीपक परब करत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT