कोकण

वाहनचोरी, घरफोड्या करणारे गुन्हेगार पकडण्यात पोलिस अपयशी

रविंद्र पेरवे

लोणेरे - रायगड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोठ्या संख्येने वाहनांची चोरी होत आहे. वाहनचोर वेगवेगळ्या शक्कल लढवून चोरी करत आहेत. परंतु, चोरीच्या दुचाकी व वाहने मिळून येत नाहीत व आरोपी देखील सापडत नाहीत. गेल्या वर्षीवाहन चोरीच्या 153 घटना झाल्या त्यापैकी 55 घटना उघडकीस आल्या. 

पोलिसांकडून मोटार चोरी गुन्ह्यांच्या आकडेवारीनुसार, रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षी मोटार वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश येत असल्याचे दिसत आहे. वाहनांच्या चोरींचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असून कित्येक दुचाक्‍यांसह चारचाकी वाहने देखील चोरी गेली आहेत. इतक्‍या मोठ्या प्रमाणात वाहनांच्या चोऱ्या होत असताना चोरीची ही वाहने जातात तरी कोठे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी देखील नागरिक करत आहे. 

वाहने चोरी सह जिल्ह्यातील घरफोड्याच प्रमाण देखील वाढत आहे. वाढता विस्तार आणि वाढत चाललेला परिघ आणि त्या प्रमाणात अपुरे पडणारे पोलिसांचे संख्याबळ शहरात वाढत्या घरफोड्या आणि जबरी चोरयांना आमंत्रण देत आहे. गेल्या वर्षी 207 घरफोड्या झाल्या त्यापैकी 94 गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले. 

पोलिस का होतात अपयशी?
घरफोडी किंवा चोरीच्या घटना रोखण्यात पोलिस का अपयशी होतात? याची कारणेही तशीच आहेत. पोलिसांकडून न होणारी व ठरावीक भागात होणारी गस्त, डीबी पथकांचे डिटेक्शन ऐवजी कलेक्शनवर असलेले लक्ष आणि दिवसा असो वा रात्री बंद राहणाऱ्या पोलिस चौक्यांमुळे या घटनांमध्ये वाढ झाली आहे. डीबी पथके गुन्हेगारांची माहिती काढण्यात कमी पडलेले आहेत. तर पोलिसांचे खबरी देखील कमी झाले आहेत.

घरफोडी तसेच वाहने चोरांना पकडण्यास पोलिसांना उशीर होत असेल मात्र बलात्कार, विनयभंग, खुनाचा प्रयत्न तसेच दरोड्यांतील गुन्हेगारांना पकडण्यास रायगड पोलिसांना शंभर टक्के यश आले आहे. 

                  2016     2017    2018 (एकूण गुन्हे/उघडकीस आलेले)
घरफोडी -   132/70   212/66   207/94
वाहन चोरी -1363/31  154/41  153 / 55.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT