कोकण

पोलिस उपनिरीक्षकासह खेडमध्ये तिघे निलंबित

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाच्या कारवाईनंतर जुगार अड्डा सुरू राहिल्याचा ठपका ठेवून खेड पोलिस ठाण्यातील तीन पोलिसांना निलंबित केले. यामध्ये पोलिस उपनिरीक्षकासह सहायक पोलिस निरीक्षक आणि हवालदाराचा समावेश आहे. पोलिस अधीक्षकांनी ही कारवाई केली असून त्यांची खातेनिहाय चौकशी लावली आहे. 

जिल्ह्यात बेकायदेशीर जुगार अड्ड्यांना आशीर्वाद देणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी दिलेला हा इशारा आहे. 

जिल्ह्यात अवैध जुगार अड्डे बंद करण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी कंबर कसली आहे. त्यासाठी त्यांनी स्वतंत्र पथकाची स्थापना केली. पोलिस निरीक्षक किंवा उपनिरीक्षकांना आदेश देऊनही ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये हे सुरू आहे, तेथे या पथकाकडून कारवाई करून पोलिस ठाण्याला इशारा दिला जातो. त्यानंतर संबंधित पोलिस ठाण्याने अवैध व्यवसाय सुरू ठेवता कामा नयेत, हा त्याचा उद्देश आहे.  

खेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भरणेनाका हा भाग सुमारे १ किमी अंतरावर आहे. येथे मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिस अधीक्षकांच्या पथकाने एकदा नाही, तर दोन वेळा धाडी टाकून कारवाई केली होती. तरीही पुन्हा हा अड्डा सुरू होता. खेड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक समर्थ बेग, सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान मयेकर आणि पोलिस हवालदार संजय मारळकर यांच्यावर ठपका ठेवला.

खेड भरणेनाका येथील जुगार अड्ड्यावर दोनवेळा छापे टाकूनही तो पुन्हा सुरू होता. कर्तव्यात कसूर केल्याने त्यांचे निलंबन केले आहे. 
- प्रवीण मुंढे,
जिल्हा पोलिस अधीक्षक, रत्नागिरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT