Political upheaval in Raigad rebelion ajit pawar ncp mla sharad pawar sunil tatkare maharashtra politics  sakal
कोकण

Ajit Pawar : रायगडमध्ये राजकीय उलथापालथ

रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीची सर्व सूत्रे खासदार सुनील तटकरे यांच्या हातात...

महेंद्र दुसार

Maharashtra Politics : रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीची सर्व सूत्रे खासदार सुनील तटकरे यांच्या हातात एकवटलेली आहेत. ताज्या घडामोडीमध्ये सुनील तटकरे आणि त्यांचे बहुतांश पदाधिकारी अजित पवार यांच्याबरोबर भाजपच्या गटात डेरेदाखल होत असल्याने रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.

या राजकीय सत्तांतरानंतर विरोधकांची ताकद पूर्णपणे क्षीण झाली आहे. रसातळाला गेलेला काँग्रेस, नेतृत्व नसलेला शिवसेनेचा ठाकरे गट आणि दिशाहीन शेतकरी कामगार पक्षाची एकत्रित ताकद सध्या तरी कुठेच दिसत नाही;

तर भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदे गटाची एक मार्गी सत्ता सुरू झाली आहे. आमदार जयंत पाटील सोडल्यास सर्वच आमदार सत्ताधारी पक्षाचे झाले आहेत; मात्र त्याच वेळेला कार्यकर्ते मात्र चांगलेच संभ्रमात पडले आहेत.

राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्याकडे पालकमंत्रिपद असताना आमची अडवणूक केली जात आसल्याचे कारण देत आमदार महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, भरत गोगावले यांनी अनेक वेळा बंड केले होते. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या तिघांनी शिंदेंच्या बंडखोरीत पुढाकार घेतला होता.

आता पुन्हा आदिती तटकरे यांच्या हाताखाली या तिघांना काम करावे लागणार आहे. मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे. तसे झाल्यास जिल्ह्यातील शिंदे गटाच्या नेत्यांवर नामुष्की येऊ शकते, असे राजकीय जाणकार सांगत आहेत.

राष्ट्रवादीमधील फुटीमुळे भाजपची ताकद वाढलेली दिसत आहे. पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर, उरणचे महेश बालदी यांची ताकद वाढलेली असताना महाडचे भरत गोगावले, कर्जतचे महेंद्र थोरवे यांना सध्याच्या राजकीय हालचालीने विचार करण्यास भाग पाडले आहे.

अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांना मात्र शेकापविरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादीचे अधिकृत पाठबळ मिळाले आहे. महेंद्र दळवी आणि सुनील तटकरे यांचे सलोख्याचे राजकीय संबंध मागील काही दिवसांत निर्माण झालेले आहेत.

आगामी निवडणुकीसाठी हे संबंध अधिक मजबूत करण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात. पेणचे आमदार रवी पाटील आणि सुनील तटकरे यांचे कधीही पटले नव्हते. दोघेही एकाच गटात आल्याने दोघांनाही जुळवून घ्यावे लागणार आहे. भाजपच्या पक्षवाढीच्या महत्त्वाकांक्षेला बळी पडलेले आणि अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश करणारे पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांची मोठी अडचण झाली आहे. भाजपकडून खासदारकीची उमेदवारी मिळणे कठीण होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT