NCP on Ajit Pawar: "अजित पवारांचा चेहरा शरद पवारांमुळे, त्यांनी लक्षात ठेवावे..."; राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय प्रवक्त्याचा इशारा

Ajit Pawar
Ajit Pawarsakal
Updated on

NCP on Ajit Pawar: राष्ट्रवादीच्या बंडखोरीचा परिणाम महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या राजकारणावर होणार आहे. मात्र, अजित पवारांच्या मनात काय चालले आहे, याबाबत अनेक दिवसांपासून अटकळ बांधली जात होती. त्याचे चित्र आज रविवारी (2 जुलै) पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील होऊन अजित पवार यांनी मोठा बंड केला आहे.

आता दरवेळेप्रमाणेच राष्ट्रवादीतही अखेर सर्व काही सुरळीत होणार की अजितदादांची घरवापसी होणार, असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. खरे तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक दिवसांपासून मतभेदांच्या बातम्या येत होत्या, मात्र अजित पवार आणि शरद पवार हे पक्षात सर्व काही ठीक असल्याचा दावा करत होते. मात्र आज मोठा स्फोट झाला.

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व पक्षाच्या चिन्हावर देखील दावा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी अजित पवार व बंडखोरी केलेल्या आमदारांना इशारा दिला आहे.

Ajit Pawar
अजित पवारांच्या बंडानंतर दिग्गज पत्रकार काय म्हणतायत? भाजपचं भविष्य धोक्यात की राष्ट्रवादीचं? Ajit Pawar NCP News

क्लाईड क्रास्टो म्हणाले, "अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाला आमच्या पक्षाने पाठिंबा दिलेला नाही, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची आहे. हा पक्ष त्यांनीच बांधला आणि या पातळीवर आणला. आज ज्यांनी आमचा विश्वासघात केला त्या सर्वांचा चेहरा शरद पवारांमुळे आला आहे. आपण त्यांचा नाश करून राष्ट्रवादी काँग्रेसचा नाश करू शकतो असे त्यांना वाटत असेल तर ते चूक करत आहेत."

Ajit Pawar
Ajit Pawar : शपथविधीला गैरहजर नेत्यांची यादी उघड; अजित पवारांसोबत अवघे २२ आमदार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sharad Pawar Rules Out NCP Merger Confirms Both Nationalist Congress Parties Will Remain Separate in Maharashtra
First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
Sunetra Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com