possibility of primary schools open in ratnagiri from monday 
कोकण

रत्नागिरीत शाळांची घंटा सोमवारपासून वाजणार ?

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला नसला तरीही शाळा व्यवस्थापन समित्यांच्या सकारात्मकतेमधून काही गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला. प्रशासनानेही लेखी आदेश नसले तरीही सध्या पालकांकडून संमतीपत्र गोळा करण्यात येत आहेत. 

कोरोनाची लाट ओसरल्यानंतर मागील शैक्षणिक सत्रापासून बंद ठेवलेल्या शाळा सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू झाले. २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळांना हिरवा कंदील मिळाला. रत्नागिरी जिल्ह्यातील ४५८ पैकी ३५८ शाळा सुरू झाल्या. एकूण ८३ हजार १३६ विद्यार्थ्यांपैकी २६ हजार जणं प्रत्यक्ष शाळेत येऊन शिक्षण घेत आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील शाळांची संख्या सर्वाधिक असून शहरी भागात याला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे.

पालक कोरोनाच्या भीतीने मुलांना शाळेत पाठवण्यास सकारात्मक नसल्याचे चित्र आहे. काही शाळांनी सोमवारपासून वर्ग भरण्याचे नियोजनही केले आहे. त्यासाठी सध्या पालकांकडून संमतीपत्र घेतली जात आहेत. राज्यात कुठेही प्राथमिक शाळा सुरू नाहीत; मात्र जिल्ह्यात शाळा सुरू होणार आहेत.

जिल्ह्यातील काही माध्यमिक शाळांमधील शिक्षक कोरोनाबाधित सापडले आहेत. सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी आहे. शनिवारी (ता. १९) ३० नवीन बाधित आढळल्याने चिंता वाढली आहे. अशीच स्थिती राहिली तर प्राथमिक शाळा सुरू करणे अडचणीचे ठरेल, अशी चर्चा आहे.

सुरू होणाऱ्या शाळांचे नियोजन

दरम्यान, सोमवारी (ता. २१) सुरू होणाऱ्या शाळांचे नियोजन झाले आहे. सोमवारी सकाळी १०.३० ते १२.३० पाचवी ते तिसरी, मंगळवारी पाचवी ते सातवी, बुधवारी पाचवी ते दुसरी, गुरूवारी पाचवी ते चौथी, शुक्रवारी पाचवी ते पहिली, शनिवारी सातवी ते सहावी सकाळी ८ ते १० असे नियोजन करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

वर्ग भरण्यासाठी पावले 

जिल्ह्यातील माध्यमिक शाळांची स्थिती गंभीर असतानाच जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील वर्ग भरण्यासाठी पावले उचलली जात आहेत. जानेवारी महिन्यात ५ ते ८ वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात येतील, अशी शक्‍यता आहे. परंतु तसे आदेश शासनाकडून आलेले नाहीत. तरीही रत्नागिरीत प्राथमिक शाळांचे वर्ग सुरू करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. शिक्षण विभागाकडून लेखी आदेश नसले तरीही तशा तोंडी सूचना दिल्याचे पुढे येत आहे.

"ग्रामीण भागातील पालकांकडून शाळा सुरू करण्यासाठी विचारणा होत आहे; परंतु प्राथमिक शाळा सुरू करण्याच्या कोणत्याही लेखी सूचना दिलेल्या नाहीत."

- निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT