the post of education officer of chiplun is empty before two months in ratnagiri 
कोकण

चिपळुणात सुरु आहे शिक्षणाधिकारी पदाचा खेळखंडोबा

नागेश पाटील

चिपळूण (रत्नागिरी) : चिपळूण पंचायत समितीच्या शिक्षण विभागास गेल्या काही वर्षापासून नियमित गट शिक्षणाधिकारी मिळालेला नाही. गेल्या दोन महिन्यापासून प्रभारी गट शिक्षणाधिकारी पदाचा खेळखंडोबा सुरू आहे.

गटशिक्षणाधिकारीपद आपल्याकडे सोपवले जाईल, या भीतीने शिक्षण विस्तार अधिकारी रजेचा फंडा वापरू लागले आहे. ५ पैकी ४ अधिकारी रजेवर गेले आहेत. त्यामुळे चारही अधिकाऱ्यांची रजा नामंजुरीचा निर्णय जिल्हा परिषद घेण्याची शक्‍यता आहे. जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनीही याला दुजोरा दिला.
चिपळुणातील जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग गेल्या काही वर्षात विविध घडामोडीवरून चर्चेत आहे. गेल्या काही वर्षात शिक्षण विभागात काहींची खोती आहे. पळणाऱ्याच्या पायात साप सोडायचा आणि त्याची मजा बघायची.

विधायक उपक्रम राबविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कामात राजकारण करून विघ्ने आणायची. असा प्रकार सुरू आहे. विस्तार अधिकारी राज अहमद देसाई यांनी गेल्या दोन तीन वर्षात प्रभारी गटशिक्षणाधिकारी पदाची जबाबदारी साभांळली. त्यापूर्वी ५ ते ६ वर्षे शिक्षण विभाग नेहमी रडारवर असायचा. देसाई यांनी पंचायत समितीचे पदाधिकारी, शिक्षक संघटना, आणि तालुक्‍यातील शिक्षक व कर्मचाऱ्यांना विश्‍वासात घेत कामकाज केले. परिणामी शिक्षण विभाग कधी रडारवर आला नाही.

जिल्ह्यात गुहागर वगळता सर्व ८ तालुक्‍यातील गट शिक्षणाधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षणाचा कारभार प्रभारीवर सुरू आहे. अशातच चिपळुणात गट शिक्षणाधिकारी पदाची जबाबदारी घेण्यास कोणी तयार नाही. ऑर्डर निघेल, असे संकेत मिळताच संबंधित अधिकारी रजेवर जात आहेत.

"पदभार स्वीकारण्यासही कोणी तयार होत नसल्याने शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. नियमितपणे त्यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. शिक्षणाधिकारी सर्वच विस्तार अधिकाऱ्यांच्या रजा नांमजूर करून त्यांना जिल्हा परिषदेत बोलावणार आहेत. लवकरच तोडगा निघेल."

- धनश्री शिंदे, सभापती, चिपळूण

दृष्टिक्षेपात...

  •   शिक्षण विभागात विस्तार अधिकाऱ्यांची आठ     पदे 
  •  ८ पैकी त्यातील तीन पदे रिक्त 
  •  तालुक्‍यात ११०० शिक्षक, २५ हजार विद्यार्थी. 
  •  काही दिवसांपूर्वी राज अहमद देसाई पडले   आजारी 
  •  त्यांच्या सहकाऱ्याकडे पदभार, पदभार   स्वीकारणारे रजेवर 
  •  ५ पैकी १ जणच आता कार्यरत

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kunbi Reservation: ओबीसी बचाव आंदोलनाची धार बोथट! पाच नेत्यांच्या पाच भूमिका; काही पक्षात अडकले, काहींना इगो प्रॉब्लेम?

Shocking : भारत-पाकिस्तान सामना पाहण्यात चाहत्यांना रस राहिला नाही? तिकीट विकल्याच जात नाही, कारण काय तर...

Nepal Protests: भारतात लष्करी शिक्षण घेणारा व्यक्ती होणार नेपाळचा सर्वेसर्वा, Gen Z च्या तांडवानंतर मोठी जबाबदारी

Latest Marathi News Updates : शेतात काम करताना दुर्दैवी घटना, इलेक्ट्रिक वायरचा धक्का लागून जागीच मृत्यू

Adani: साडेसात हजार कोटी द्या! अदाणींची ‘परिवहन’कडे मागणी, राज्य शासनाचे ५०० कोटी बुडणार; नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT