पोल्ट्री व्यवसायिकांना सुखाचे दिवस येणार - विशाल परब  
कोकण

पोल्ट्री व्यवसायिकांना सुखाचे दिवस येणार - विशाल परब

केंद्रीय मंत्री राणेंच्या माध्यमातून समृद्ध करणार

सकाळ वृत्तसेवा

कुडाळ : माणगाव खोऱ्यातील पोल्ट्री व्यवसायिकांना सुखाचे दिवस येणार आहेत. स्लोटर हाऊस, हॅचरीज, उत्पादन क्षमता, भागभांडवल, हमीभाव मिळवून देत पोल्ट्री व्यवसायिक शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून निलेश राणेंच्या प्रेरणेतून समृद्ध करणार, अशी ग्वाही भाजप युवा नेते विशाल परब यांनी माणगाव येथील कार्यक्रमात दिली.

सिंधुदूर्गातील पोल्ट्री व्यवसायिक यांना नवी दिशा आणि गती देऊन सक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने माणगाव खोऱ्यात स्लोटर हाऊस, हॅचरीज, उत्पादन क्षमता वाढविण्याच्या दृष्टीकोनातून श्री. परब यांनी वाटचाल केली आहे. श्री. परब म्हणाले, ``येणाऱ्या नजिकच्या काळात कोणतीही निवडणूक नाही. मला निवडणूक लढवायची नाही. ईच्छाही नाही. त्यामुळे राजकीय म्हणून नाही तर युवा उद्योजक म्हणून रोजगार देत आत्मनिर्भर व स्वावलंबी बनवण्यासाठीच मी प्रयत्न करतो हाच एकमेव उद्देश आहे. पोल्टी व्यवसायिकांची एक मोठी संघटना तयार करणार.

दिल्लीमध्ये ग्रीन सीग्नल मिळाल्यानंतर पहिला स्लोटर हाऊस माणगांव खो-यातच होणार १५ ते २० रूपये अधिकचा भाव शेतकऱ्याला मिळणार याची खात्री देतो. नवीन पोल्टी धारकांना राणे यांच्या माध्यमातून बँकाच्या सहकार्याने २५ ते ५० लाख रूपये उपलब्ध करून देणार; मात्र नियम आणि अटी या शेतकऱ्यांनी स्थिती पाहूनच करावी. शेतकऱ्यांनी आपली नावनोंदणी करण्यासाठी अॅप तयार करून दसऱ्याच्या शुभमुर्तावर निलेश राणेंच्या हस्ते अॅपच उद्घाटन होणार आहे.`` प्रकाश मोर्ये, धोंडू चिंदरकर, मोहन सावंत, विनायक राणे, राजा धुरी, भाई बेळणेकर, दादा साईल, अमोल भिसे, सचिन धुरी, सरपंच, उपसरपंच संजय म्हाडगुत, दिनेश शिंदे, रवि राऊळ, दिपक खरात आदी उपस्थित होते.

जागतिक पातळीवर माणगाव गाव नेणार

येत्या दिवाळीमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात येणार आहे, असे श्री. परब यांनी सांगून जागतिक पातळीवर माणगाव गाव नेणार असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: शासनाची मोठी कारवाई! ‘लाडक्या बहिणी’ कायमच्या अपात्र; घेतलेले पैसेही परत द्यावे लागणार, पण कुणाला?

Sports: क्रिकेटपटू भाविका अहिरे अंडर १९ महिला संघाच्या कर्णधारपदी; दोंडाईचाचे आजोळ, नाशिकची कन्या

Nanded: कोरोनात आई-वडिलांचे छत्र हरपले; जिद्दीने वैष्णवी बनली डॉक्टर, मेहनतीच्या जोरावर एमबीबीएस केलं पूर्ण

आमची बाळं कुठं आहेत? घरातल्या कुणाशीच चेहरा जुळेना; IVFद्वारे जुळ्या मुलींचा जन्म, DNA रिपोर्ट पाहून दाम्पत्याला धक्का

Latest Live Updates Marathi: चोपड्यात आयसर चालकावर हल्ला; गोवंश वाहतुकीचा आरोप करत गाडीची तोडफोड

SCROLL FOR NEXT