The power connections of zp schools have been disconnected from mseb 
कोकण

म्हणुन... जिल्हा परिषदेच्या तब्बल ८८ शाळांचे वीज कनेक्शन कट....

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या ८८ शाळांची बिले थकीत राहिल्याने वीज जोडणी महावितरणकडून तोडण्यात आली आहेत. बिले भरण्यासाठी पुरेसा निधीच जमा न झाल्यामुळे ही वेळ आली आहे. ही बिले ग्रामपंचायतींनी स्वनिधी भरावीत, अशा सूचना ग्रामविकास विभागाकडून काढण्यात आल्या आहेत. अनेक ग्रामपंचायतींना स्व उत्पन्न नसल्यामुळे आधीच अडचणीत आहेत, त्यात शाळांची बिले भरण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे.

जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता सुधारावी, यासाठी आधुनिक तंत्राचा उपयोग शिक्षणात करा, अशा शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील पावणेतीन हजार शाळांपैकी बहुतांशी शाळा टेक्‍नोसेव्ही झाल्या आहेत. शाळांमध्ये संगणक, प्रोजेक्‍टर लोकसहभागातून विकत घेण्यात आले आहेत. याचा वापर करण्यासाठी शाळांमध्ये विजेची गरज लागते. शासनाकडून बिले भरण्यासाठी वेगळी तरतूद केलेली नाही. काही महिन्यांपूर्वीच्या शासन निर्णयानुसार वीज आकारणीत शिथिलता देण्यात आली आहे; परंतु पटसंख्या कमी असल्याने शासनाकडून शाळांना मिळणाऱ्या समग्र अभियानातील रक्‍कम अत्यल्प असते. हा निधी फक्‍त बिलासाठी नव्हे तर अन्य सुविधांवरही खर्च करावा लागतो. पंखा, ट्यूब, संगणक किंवा प्रोजेक्‍टरही शाळेत आहेत. त्यामुळे महिन्याची बिले वाढत आहेत. ती भरणे शक्‍य नसल्याने अनेक शाळांची अवस्था बिकट आहे. सहा ते सात महिने बिल न भरल्यामुळे जिल्ह्यातील ८८ शाळांची वीज तोडण्यात आली आहे. त्यामुळे शाळांमध्ये विजेवर चालणारी सगळीच यंत्रणा बंद आहे. 

बिलांचा बोजा अडचणीचा ठरणार

या विषयावर दोन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद स्थायी समितीत चर्चा झाली. त्यामध्ये प्राथमिक शाळांची देयके ग्रामपंचायतीने स्वनिधीतून भरावीत, असा निर्णय झाला. त्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करून ग्रामपंचायत स्तरावर आवश्‍यक तरतूद बिल भरण्यासाठी करावी, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या आहेत. तसे पत्र वीजजोडणी तोडलेल्या शाळांना ग्रामपंचायत विभागाकडून काढण्यात आले आहे; मात्र बिलांचा बोजा बहुतांश ग्रामपंचायतींसाठी अडचणीचा ठरणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायतींनी स्वनिधीतून बिले भरण्यात यावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसे पत्र ग्रामपंचायतींना पाठविण्यात आले आहे.
-मनीषा देसाई
उपमुख्य कार्यकारी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

Raigad News: महाड MIDCमध्ये पुन्हा गॅसगळती, एका कामगाराचा मृत्यू, ८ जण जखमी

Viral Video : तीन वर्षांचा चिमुकला आईची तक्रार घेऊन थेट पोलीस चौकीत पोहोचला, म्हणाला- तिला जेलमध्ये टाका; कारण ऐकून पोलिसांनाही आवरेना हसू

Marathi News Live Updates : मुंबईत भारतीय नौदलाचा खलाशी, पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले मृतावस्थेत आढळली

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT