रत्नागिरी : भाट्ये येथे सागरी महामार्गावरून दहशतवादी व स्फोटके रत्नागिरी पोलिसांनी पकडली. शहरात घातपात करण्याच्या संशयाने काही काळ खळबळ उडाली; परंतु रत्नागिरी जिल्हा पोलिसांची ऑपरेशन रत्नदुर्ग (डमी डिकॉय) ही मोहीम असल्याचे समजल्यानंतर साऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
१९९३ मधील बॉम्बस्फोट व २६/११ चा दहशतवादी हल्ला आणि वर्षअखेरीच्या पार्श्वभूमीवर सागरी मार्गाने अतिरेकी घुसखोरी करून हल्ला करू शकतात. यामुळे जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणेची सतर्कता तपासणी करण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
मोहिमेसाठी ‘ऑपरेशन रत्नदुर्ग’ असे नाव दिले होते. याकरिता रेड फोर्स (शत्रू पक्ष) व ब्ल्यू फोर्स अशी दोन पथके तयार केली. रेड फोर्सकडून धर्मस्थळे, गर्दीची ठिकाणे, चेकपोस्ट आदी ठिकाणे टार्गेटवर होती. मोहिमेकरिता रेड फोर्स म्हणून २ वाहने, ६ बनावट दहशतवादी यांचा वापर केला. दहशतवाद्यांकडून बनावट स्फोटक पदार्थ वाहनांतून वाहतूक करून सुरक्षेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी वाहून नेण्याचा प्रयत्न केला. या मोहिमेचे नोडल अधिकारी म्हणून सुरक्षा शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी कामकाज पाहिले. यापुढेही ही यंत्रणा बळकट व परिणामकारक होण्याकरिता वेगवेगळे अभियान राबविण्यात येणार असल्याचे डॉ. गर्ग यांनी सांगितले.
रेड फोर्स ठरली यशस्वी
शहर पोलिस ठाणे हद्दीतील भाट्ये चेकपोस्ट येथे रेड फोर्समधील बनावट दहशतवाद्यांनी स्फोटके नेण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी बनावट दहशतवाद्यांना पकडले. त्यांच्याकडे संशयास्पद वस्तू आढळल्याने तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षात कळवून राखीव फोर्स, बॉम्बशोधक व नाशक पथक, अग्निशमन दलास पाचारण केले. दोन्ही बाजूंची वाहतूक थांबविली. आबलोली व खंडाळा चेकपोस्ट येथे सुरक्षा यंत्रणेची सतर्कता तपासण्यात आली. तेथील सुरक्षा यंत्रणा सतर्क असल्यामुळे रेड फोर्सला यशस्वी होता आले नाही.
३५ अधिकारी, २३२ पोलिस अंमलदार...
ब्ल्यू फोर्स म्हणून जिल्ह्यातील धर्मस्थळे, गर्दीची ठिकाणे, चेकपोस्ट या ठिकाणी ३५ पोलिस अधिकारी व २३२ पोलिस अंमलदार, ७० होमगार्ड, २७ सुरक्षा वॉर्डन असा पोलिस बंदोबस्त केला होता.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.