कोकण

खासदार राऊतांकडून कोत्‍या मनोवृत्तीचे दर्शन; जठारांकडून टीका

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सर्वांचे होते. राणे आणि त्‍यांच्यामध्ये मतभेद झाले असले तरी मनभेद कधीच नव्हते.

कणकवली : स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक आदींसह बाळासाहेब ठाकरे या विभूती कुणाची खासगी मालमत्ता नाहीत. त्‍यांच्या स्मारकांचे दर्शन घेण्याचे स्वातंत्र्य सर्वांना आहे. पण खासदार विनायक राऊत (vinayak raut) यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या (balasaheb thackeray) स्मारक स्थळाला भेट देण्याचा अधिकार केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांना नाही, असे म्‍हणत कोत्‍या मनोवृत्तीचे दर्शन घडविले असल्‍याची टीका भाजपचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी केली.

जठार म्‍हणाले, महान विभूतींची स्मारके ही कुणाची खासगी मालमत्ता नाही. तर तो राष्‍ट्राचा जाज्‍वल्य वारसा आहे. जगभरातील अनेक मंडळी हा वारसा पाहण्यासाठी येत असतात. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकापर्यंत केंद्रीयमंत्री नारायण राणेंना जाऊ देणार नाही, असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला होता. पण राणे यांना शिवतीर्थावर जाण्यापासून कुणीही रोखू शकलं नाही.

ते म्‍हणाले, शिवसेनाप्रमुख (shivsena) बाळासाहेब ठाकरे हे सर्वांचे होते. राणे आणि त्‍यांच्यामध्ये मतभेद झाले असले तरी मनभेद कधीच नव्हते. राणेंनीही आज शिवतीर्थावर भेट देऊन बाळासाहेबांप्रती आदर आणि आपल्‍या नेकदिलाचे दर्शन घडवले. त्‍यामुळे संसदेत गेलेल्‍या खासदार राऊत यांनी आपल्‍या मनाचा कोतेपणा दाखवून बाळासाहेबांची उंची कमी करू नये. तर आपल्‍या खासदारकीचा महाराष्‍ट्राच्या विकासाला फायदा करून द्यावा. राजकारण हे जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी नव्हे तर जनतेच्या विकासासाठी असावे हे राऊत यांनी लक्षात घ्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT