Pramod Jathar esakal
कोकण

राणेंना महाड दाखवलंत, आम्ही मुख्यमंत्र्यांना उत्तर प्रदेश दाखवू

राजेश सरकारे

कणकवली (सिंधुदुर्ग) : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Minister Narayan Rane) यांच्यावर ठाकरे सरकारनं महाड पोलिस ठाण्यात (Mahad Police Station) आणून कारवाई केली. आता आम्‍ही मुख्यमंत्र्यांना (CM Uddhav Thackeray) उत्तरप्रदेश दाखवणार असल्‍याचा इशारा भाजपचे प्रदेश चिटणीस आणि जन आशीर्वाद यात्रा संयोजक प्रमोद जठार (BJP state secretary Pramod Jathar) यांनी आज दिला. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यापुढील माईक सुरू ठेवून त्‍यांच्याच सहकाऱ्यांनी त्‍यांचा गेम केला, असंही ते म्‍हणाले.

राणेंवर अटकेची कारवाई होण्यासाठी परिवहन मंत्री परब यांनी पोलिस प्रशासनावर दबाव टाकला आहे.

येथील भाजप कार्यालयात जठार यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्‍हणाले, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्‍यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात आक्षेपार्ह विधाने केली आहेत. त्‍यामुळे आता मुख्यमंत्र्यांविरोधात उत्तरप्रदेशमध्ये गुन्हे दाखल होणार आहेत. त्‍यांनी राणेंना महाडला आणले, तर आम्‍ही त्‍यांना उत्तरप्रदेश दाखविणार आहोत.

ते पुढे म्‍हणाले, राणेंवर अटकेची कारवाई होण्यासाठी परिवहन मंत्री परब यांनी पोलिस प्रशासनावर दबाव टाकला. त्‍याबाबतचा संपूर्ण घटनाक्रम कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. त्‍यामुळे परबांविरोधात सीबीआय चौकशीची आम्‍ही मागणी केली आहे. वस्तुत: परिवहन मंत्री परब यांच्या बाजूला सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि एक आमदार बसले होते. परब यांचे फोनवरून संभाषण सुरू असताना, या दोहोंना टेबलवरील माईक बंद करता आला असता; पण तो बंद न करता या दोहोंपैकी एकाने परिवहन मंत्री श्री. परब यांचा गेम केला. यात आता परब हे पुरते अडचणीत आले आहेत.

छत्रपती संभाजी महाराजांशी तुलना नाही

केंद्रीयमंत्री राणे आणि आम्‍ही सर्व मंडळी छत्रपती संभाजी महाराजांच्या दर्शनाला जाणार होतो. तत्‍पूर्वी पोलिसांनी राणेंवर अटकेची कारवाई केली. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना झालेल्या अटकेची कारवाई आम्‍हाला आठवली. पत्रकार परिषदेत बोलताना त्‍या कारवाईचा दाखला आम्‍ही दिला. यात छत्रपत्री संभाजी महाराजांशी तुलना करण्याचा मूळीच हेतू नव्हता. मात्र, आमदार वैभव नाईक आणि आमदार राजन साळवी यांचा इतिहास कच्चा असल्‍याने ते आमच्यावर गुन्हे दाखल करण्याची भाषा बोलत असल्‍याचे जठार म्‍हणाले.

संजय राऊतांवर गुन्हा दाखल व्हायला हवा

संजय राऊत यांनी 'सामना' वृत्तपत्रात मराठा मोर्चाच्या अनुषंगाने मराठा समाजाची मानहानी करणारे व्यंगचित्र प्रसिद्ध केले होते. त्‍यामुळे संजय राऊत यांच्यावरही गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी आमची मागणी असल्‍याचे जठार म्‍हणाले. शिवसेनेला मराठा आरक्षण द्यायचेच नाही. तशी शिवसेनेची इच्छाही नाही, असा आरोपही जठार यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याला गती; विक्रोळीत टनेल बोरिंग मशीनचा ३५० टनांचा कटरहेड यशस्वीपणे बसवला

MHADA E-Auction: म्हाडाच्या व्यावसायिक व कार्यालयीन गाळ्यांचा ई-लिलाव; २० मेपासून नोंदणी, २४ जूनला ऑनलाइन बोली

Mira Bhayandar Virar Metro: मिरा-भाईंदर ते विरार मेट्रोसाठी १७,७२४ कोटींचा नवा प्रस्ताव; मार्ग बदलून २४.९ किमी, १७ स्थानकांची योजना

Mumbai Suburban Upgrade: दादर स्थानकावर ३४ वर्षांनंतर सिग्नल यंत्रणेचा कायापालट

SCROLL FOR NEXT