prasad lad press conference in sindhudurg 
कोकण

'ठाकरे सरकारने कोकणवासीयांच्या तोंडाला पुसली पाने '

सकाळ वृत्तसेवा

कणकवली (सिंधुदुर्ग) :  कोकणाने शिवसेनेला भरभरून दिले. पण ठाकरे सरकारने निसर्ग वादळ ग्रस्तांना तुटपुंजी मदत देऊन कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले असा आरोप भाजप प्रदेश चे उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी आज येथे केले. निसर्ग चक्रीवादळामुळं कोकणात मन हेलावून टाकणारी परिस्थिती आहे. झाडं आणि घरं अक्षरश: रडत आहेत. इतकी भीषण परिस्थिती असताना ठाकरे सरकारनं कोकणला अवघी 75 कोटींची मदत जाहीर केली आहे. वादळामुळं पडलेली झाड़ं बाजूला काढून साफसफाई करायची म्हटलं तरी हे पैसे पुरणार नाहीत असेही ते म्हणाले.


 येथील प्रहार भवन मध्ये  प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारच्या कारभारावर टीका केली. ते म्हणाले, निसर्ग वादळाने कोकणातील शेतकर्‍यांची हजारो कोटींची हानी झाली आहे. 75 किंवा 100 कोटींची मदत करून काहीही होणार नाही. आम्ही केंद्राच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र राज्य शासनाने आपली जबाबदारी झटकू नये. रायगड, रत्नागिरीतील अनेक घरांचे पत्रे उडून गेले आहेत. त्याअनुषंगाने आम्ही 20 ट्रक सिमेंट आणि पत्र्याचे पत्रे तेथ पाठवले आहेत. पुढील काळात आणखी 80 ट्रक पत्रे तेथे पाठवणार असल्याचे श्री.लाड म्हणाले.

रायगड, रत्नागिरीत कधी शिवसेनेच तर कधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्री येऊन आढावा घेत आहेत. प्रत्यक्षात मात्र तेथील नुकसानग्रस्तांना मदत मिळालेली नाही. वीज पुरवठा ठप्प आहे. घरातील अन्नधान्य देखील वाया गेलेलं आहे. अशावेळी ठाकरे सरकारने तातडीने मदत यंत्रणा राबवायला हवी होती. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त गावांची फारशी पाहणी केलेली नाही. रत्नागिरीत देखील ते आलेले नाहीत.

कोकणातील जनतेने आजवर शिवसेनेला भरभरून दिले. पण कोकणातली जनता म्हणजे शिवसेनेची मालमत्ता आहे, अशा पद्धतीनं शिवसेना वागत असल्याचा घणाघाती आरोप श्री.लाड यांनी केला. त्यांच्या सोबत आमदार नीतेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, अतुल काळसेकर, प्रमोद जठार, कालिदास कोळंबकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: 7 वर्षं गुहेत जगली, मुलींना कसं सांभाळलं? किराणा कशी आणायची... संपूर्ण कहाणी ऐकून बसेल धक्का, रशियन महिलेचा व्हिडिओ

माेठी चाेरी! 'राहुरीतील सराफा दुकान फाेडले'; ३२ तोळे सोने, ३० किलो चांदीच्या दागिन्यांसह ६० लाखांचा ऐवज चोरीस

BSE Bomb Blast Threat : बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बॉम्बने उडवून देण्याची धमकी; बीएसईच्या वेबसाईटवर ईमेल अन् पोलिस अलर्टवर

'हॅरी पॉटर' टीव्ही मालिकेतील हॅरी पाहिलात का? फस्ट लूक व्हायरल, फोटो पाहून तुम्हालाही बालपणाची आठवण येईल

Vilas Bhumre: अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर ‘मकोका’; मुख्यमंत्री, संभाजीनगरकडे विशेष लक्ष देणार

SCROLL FOR NEXT