कोकण

CM Ekanth Shinde : मुख्यमंत्र्यांच्‍या सभेची जय्यत तयारी; उदय सामंत

पालकमंत्री उदय सामंतांचे तगडे नियोजन; गटनिहाय तीन हजार कार्यकर्ते

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुक्रवारच्या रत्नागिरी (ता. १६) दौऱ्याची जम्बो तयारी केली आहे. सुमारे २५ ते ३० हजार कार्यकर्त्यांची विक्रमी सभा करण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी एसटी विभागाच्या सुमारे १३० एसटी गाड्या बुक केल्या आहेत. मतदारसंघातील जिल्हा परिषद गटनिहाय ३ हजार कार्यकर्त्यांचे उद्दिष्ट प्रमुख पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यांच्याही स्वतंत्र गाड्या असणार आहेत. उद्योगमंत्र्यासह भैया सामंत, शिंदे गटाचे प्रमुख पदाधिकारी दिवसरात्र नियोजनामध्ये व्यस्त आहेत.

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे-फडणवीस युती सरकार राज्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे प्रथमच रत्नागिरी तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सामंत यांचे हे होमपीच आहे. त्यामुळे अल्पावधीत शिंदे गटाने तालुक्यात आणि जिल्ह्यात चांगलीच मोट बांधली आहे. शिंदे गटाची ताकद आता दिसू लागली आहे. उदय सामंत यांची स्वतंत्र पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फळी आहे. त्यात काही निष्ठावंत शिवसैनिक त्यांच्याबरोबर आल्याने शिंदे गट अधिक मजबूत होताना दिसत आहे. गटाचे प्रणेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच रत्नागिरीत येत आहेत. त्यांचे जल्लोषात आणि राजकीय ताकदीने स्वागत करण्याचा पालकमंत्र्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी शहरात स्वच्छता सुरू आहे. प्रमोद महाजन क्रीडांगणावर सभा होणार असल्याने तो मार्ग चकाचक केला जात आहे. दुभाजक स्वच्छ करून त्यांना रंग दिले जात आहेत. शहराच्या प्रवेशद्वारापासून ते सभास्थळापर्यंत सर्वत्र बॅनर लावण्यात आले आहेत. भगवे झेंडे फडकवण्यात आले आहेत. स्वागत कमानी उभ्या राहिल्या आहेत.

पार्किंगची विशेष सोय

रत्नागिरी मतदारसंघातील १० गटांतून सुमारे २५ ते ३० हजार कार्यकर्ते सभेला आणण्याचे नियोजन आहे. त्यासाठी एसटीच्या सुमारे १३० ते १४० गाड्या आरक्षित केल्या आहेत. प्रत्येक गाडीमध्ये ५० ते ५५ व्यक्ती भरण्यात येणार आहेत. प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणखी स्वतंत्र गाड्यांची व्यवस्था केली आहे. निव्वळ एसटीतून येणारे कार्यकर्ते जवळपास ७ हजारांवर असणार आहेत. येणाऱ्या वाहनांना आठवडा बाजार येथील दोन्ही रिकाम्या जागा, रहाटाघरसमोरील जागा, ८० फुटी हायवेच्या बाजूला व अन्य ठिकाणी पार्किंगची सोय केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT