कोकण

सावंतवाडीची सांस्कृतिक परंपरा जपा

CD

swt166.jpg
84004
सावंतवाडीः येथे ‘डान्स सावंतवाडी डान्स’ कार्यक्रमाचे उद्घाटन करताना हेमंत निकम. व्यासपीठावर श्रीधर पाटील, सागर साळुंखे, प्रदीप नरळे, संदीप गावडे, हरिश्चंद्र पवार, अभिमन्यू लोंढे व अन्य.

सावंतवाडीची सांस्कृतिक परंपरा जपा
हेमंत निकमः ‘डान्स सावंतवाडी डान्स’ कार्यक्रमाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ : ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व लाभलेल्या सावंतवाडी शहराला संस्थानकालापासून मोठी सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. हा ठेवा कायम ठेवण्याचे काम सावंतवाडी ओंकार कलामंचाच्या माध्यमातून होत आहे. हे कौतुकास्पद आहे, असे मत सावंतवाडीचे प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी व्यक्त केले.
युवा नेते संदीप गावडे यांच्या माध्यमातून पुरस्कृत सावंतवाडी ओंकार कलामंच डान्स अॅकॅडमीच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘डान्स सावंतवाडी डान्स’ या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. नृत्याच्या माध्यमातून आता करियरच्या अनेक संधी निर्माण होत असून, मोबाईलच्या आहारी गेलेल्या तरुणाईला वॉर्मअपकडे वळविण्याच्या दृष्टीने पालकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील, मुख्याधिकारी सागर साळुंखे, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप नरळे, हरिश्चंद्र पवार, अभिमन्यू लोंढे, विलास पोळ, संदीप गावडे, अमोल टेंबकर, अनिकेत आसोलकर, राजेंद्र पवार, मंदार काळे आदी उपस्थित होते.
श्री. निकम म्हणाले, "सद्यस्थितीत सगळीकडे निवडणुकांचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत ओंकार कलामंचाच्या माध्यमातून या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा घेण्यात आलेला निर्णय कौतुकास्पद आहे. सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेच्या माध्यमातून अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळणार आहे. त्यामुळे ओंकार कलामंचच्या माध्यमातून सावंतवाडीचा सांस्कृतिक ठेवा जपण्याचे सुरू असलेले काम कौतुकास्पद आहे."
मुख्याधिकारी साळुंखे यांनी, या राज्यस्तरीय नृत्य महोत्सवाच्या माध्यमाधून जिल्ह्यातील अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळणार आहे. त्याचा फायदा त्यांना भविष्यात होणार आहे, असे मत व्यक्त केले. श्री. गावडे यांनी, ओंकार कलामंचाच्या माध्यमातून मुलांना घडविण्याचे काम होते. हा उपक्रम स्तुत्य आहे. या उपक्रमातून ओंकार कला मंचाचा प्रवास लक्षात येतो. या ग्रुपच्या माध्यमातून येणाऱ्या काळात अधिकाधिक कलाकारांना संधी मिळावी, अशी सांगितले. डान्स अॅकॅडमी व मंचाच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या प्रत्येक उपक्रमास आपले सहकार्य असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सूत्रसंचालन विलास पांचाळ यांनी केले. टेंबकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Numerology : उशिरा का होईना पण यशस्वी होतातच 'या' तारखेला जन्मलेले लोक...नशिबात असतो अधिकारी बनण्याचा योग

Hormone Balance Tips: हार्मोन संतुलित ठेवायचे आहेत? सायली शिंदेचे खास योग व जीवनशैली टिप्स; दैनंदिन जीवनात कसे अमलात आणायचे पाहा

Latest Marathi News Live Update : पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीसोबत लढण्यास कॅाग्रेस तयार नसल्याची सुत्रांची माहिती ..

Western Railway : विकेंडला ३०० लोकल रद्द! पश्चिम रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, वाचा कधी आणि का?

Kolhapur Election : कोल्हापूर महापालिका निवडणुकीत उत्साह शिगेला! दोन दिवसांत तब्बल १०४६ अर्जांची विक्री, प्रत्यक्ष दाखल फक्त तीन

SCROLL FOR NEXT