prevent corona infection Independent prison at Gogte College in ratnagiri 
कोकण

कारागृहामध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रत्नागिरीत अशी लढवली शक्कल...

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी  : राज्यातील कारागृहामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. नव्याने येणार्‍या कैद्यांसाठी विलगिकरण आवश्यक असल्याने 40 बंदीवानांच्या क्षमतेचे तात्पुरते स्वतंत्र कारागृह करण्याचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत. त्यानुसार गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कॉमर्सच्या इमारतीमध्ये महिला-पुरूषांसाठी वेगळे दोन कक्ष तयार केले आहेत. तिथे गार्ड रुमची व्यवस्थाही केली आहे.

 
जिल्हा विशेष कारागृहामध्ये सुमारे सव्वा दोनशे कैदी ठेवण्याची क्षमता आहे. मात्र सध्या 150 कैदी आहेत. कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेऊन कारागृहा प्रशासनाने योग्य ती खबरदारी
घेतली आहे. राज्यातील अन्य कारागृहांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मात्र रत्नागिरी कारागृह अजूनही कोरोनापासून मुक्त आहे. फैलाव रोखण्यासाठी यापूर्वीच काही उपायोजना करण्यात आल्या आहेत. सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते, अशा कैद्यांना 45 दिवसाच्या पॅरॉल (रजेवर) सोडण्यात आले आहे. कैद्यांच्या सुरक्षेची पुर्ण काळजी कारागृह प्रशासनाने घेत आहे. मास्क, बराकमध्ये हॅण्डवॉश, सोशल डिस्टन्स आदीची सक्तीचे केले आहे.


मात्र नव्याने दाखल होणार्‍या कैद्यांमुळे कारागृहात कोरोनाचा शिरकाव होऊ शकतो. हे टाळण्यासाठी कारागृहा प्रशासनाने जिल्हाधिकार्‍यांना तात्पुरत्या स्वतंत्र कारागृहाचा प्रस्ताव दिला होता. त्यावर आज जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आदेश काढले आहेत. नवीन कैद्यांना विलगिकरण आवश्यक असल्याने 40 बंदीवानांच्या क्षमतेचे तात्पुरते स्वतंत्र कारागृह करण्याचे आदेश केले आहेत. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कॉमर्सच्या इमारतीमध्ये 20 महिला आणि 20 पुरूषांसाठी वेगळे दोन कक्ष तयार करून गार्ड रुमची व्यवस्थाही केली
आहे. त्यामुळे आता नवीन कैद्याला आदी तात्पुरत्या कारागृहाची हवा खावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram Karnataka Order : काँग्रेस सरकारचा मोठा निर्णय! शासकीय कार्यक्रमात 'वंदे मातरम्'ची आता फक्त 2 कडवीच गायली जाणार; नवा आदेश जारी

Marathi News Live Updates : संसदरत्न पुरस्काराने खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांचा सन्मान

Mumbai Crime: विनातिकीट प्रवाशाची टीसीला मारहाण, धक्का देत चेहऱ्यावर बुक्का मारला अन्...; मुंबईत खळबळजनक प्रकार

Madhuri Elephant Kolhapur : माधुरी हत्तीण वनतारातून कोल्हापूरला रवाना; मठाचे वकील मनोज पाटील यांची माहिती

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

SCROLL FOR NEXT