कोकण

HRCT 10, फुफ्फुस 40 टक्के बाधित; तरीही जगण्याच्या जिद्दीने कोरोनावर मात

सचिन माळी

मंडणगड : अँटिजेंन, (antigen test) आरटीपीसीआर केलेल्या टेस्ट निगेटिव्ह (RTPSR test) आल्यानंतरही जाणवणारा थकवा, अंगदुखी नंतर श्वसनाच्या त्रासाबरोबर खोकला यानंतर एचआरटीसी टेस्टचा सिटीस्कॅन (sitiscan) स्कोर १० आला. त्वरित रुग्णालयात डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत सर्वांनी दिलेल्या मानसिक आधाराच्या जोरावर कोरोनाच्या महापुरात यशस्वी पोहून मात करणाऱ्या अशोक गोवर्धन जगताप यांचा अनुभव दिलासादायक आणि बाधितांची मानसिकता दृढ करणारा आहे.

मंडणगड तालुक्यातील वेरळ तर्फे वेसवी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असणारे अशोक जगताप यांचे वडिल गोवर्धन भिमाजी जगताप यांचे मूळगावी बीड (beed) येथे दुःखद निधन झाले. त्यासाठी जगताप हे बीडला गेल्यानंतर त्यांनाही कोरोनाची लागण झाली. मात्र त्यांनी स्वतःचा आत्मविश्वास ढळू दिला नाही. त्यांना दोन दिवस थंडी-ताप होता. डोके जड झाले होते, अंगात खूप थकवा जाणवत होता, कसलाही वास येत नव्हता, तोंडाला चव राहिली नव्हती. ही लक्षणे अनुभवल्यानंतर त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन अँटिजेंन कोव्हीड टेस्ट (covid-19 test) करून घेतली. ती निगेटिव्ह आली. मात्र लक्षणे असल्याने डॉक्टरांनी त्यांना आरटीपीसीआर RTPCR टेस्ट करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. त्यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात जाऊन RTPCR टेस्ट केली. रिपोर्ट येण्यासाठी दोन दिवस गेले. यातही आश्चर्य म्हणजे रिपोर्ट निगेटिव्ह आला. रिपोर्ट निगेटिव्ह (negative report) आल्याने जगताप हे बिनधास्त झाले. पण अंगात खूप थकवा होता, अस्वस्थ वाटत होते. हात-पाय आणि संपूर्ण अंग दुखत होते. म्हणून घरी दोन दिवस आराम केला पण थकवा आणि अंगदुखी कमी होत नव्हती.

काही दिवसांनी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. बोलताना गुदमरल्यासारके वाटू लागले आणि जोराचा खोकला येऊ लागला. त्यानंतर छातीरोग तज्ज्ञांकडून त्यांनी HRCT करून घेतली. यात सिटीस्कॅन स्कोर 10 आला. त्यांचे फुप्फुस 40% इन्फेक्ट झाल्याचे निदान झाले. मग मात्र त्यांनी लागलेच बीड रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्यास सुरुवात केली. डॉक्टरांसह स्टाफने त्यांना मानसिक आधार दिल्याचे त्यांनी सांगितले. घरचे, मित्र मंडळ, नातेवाईक यांनीही फोन करून, व्हिडिओ कॉल करून शाब्दिक आधार दिला. कोरोनारुपी महापुरात पोहण्यास प्रोत्साहन दिले. त्यानंतर त्यांनी या कोरोनारूपी महापुराला घाबरण्याचे सोडून देत यात पोहून पार करण्याचा निर्धार केला. आत्मविश्वास ढळू दिला नाही. योग्य उपचाराने, डॉक्टरांच्या व स्टाफच्या मेहनतीने अशोक जगताप हे सुखरूप कोरोना महापूरातून बाहेर पडले.

"लक्षणे दिसताच मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायच्या अगोदर स्वतःला होम आयसोलेट करून घेतले होते. हॉस्पिटलमध्येही एकटाच गेलो. दहा ते बारा दिवस उपचार घेतले. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतले. माझी तब्बेत सुधारत गेली. यादरम्यान मानसिकता खचू दिली नाही. डिस्चार्ज घेऊन घरी आल्यानंतर २८ दिवस अलगीकरणात राहिलो. गरम पाणी पिणे, वाफ घेणे, मोड आलेले कडधान्य याचा आहार घेणे, अंडी अणि नॉनव्हेज असा सकस आहार घेतला. सकाळी हलका व्यायाम करणे, भरपूर आराम घेणे, तसेच ताणतणाव येणार नाही अशी कामे टाळली."

- अशोक जगताप, प्राथमिक शिक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT