roha.jpg 
कोकण

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा रोह्यात शुभारंभ

पराग फुकणे

रोहा : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ तालुक्यातील प्रत्येक पात्र शेतकरी बांधवांना मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून केवळ वीस दिवसांच्या कालावधीत सुमारे पावणे नऊ हजार शेतकऱ्यांच्या कागदपत्र जमा करण्याचे मोठे आव्हान तहसील कर्मचारी व कृषि विभागाच्या कर्मचारी वर्गाने पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन रोह्याचे उपविभागीय अधिकारी रविंद्र बोंबले यांनी केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा तालुकास्तरावर शुभारंभ उपविभागीय अधिकारी रविंद्र बोंबले यांच्या हस्ते व तहसीलदार कविता जाधव, तालुका कृषि अधिकारी कुमार जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी उपविभागीय अधिकारी रविंद्र बोंबले बोलत होते. तहसीलदार कविता जाधव यांनी भारत कृषिप्रधान देश असून आपले मूळ ही आपली माती आहे. हरितक्रांतीद्वारे शेतकरी समृद्ध झाल्यानंतर मात्र अनेकदा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी उध्वस्त झाला. शेतकरी बांधवांना लाभार्थी नव्हे तर, हक्कार्थी म्हणून त्यांच्या आर्थिक नियोजनासाठी वर्षाच्या प्रत्येक टप्प्यावर अर्थसहाय्य मिळेल,  शेतकरी पुन्हा समृद्ध होतील असा विश्वास व्यक्त केला.
 

तालुका कृषी अधिकारी कुमार जाधव यांनी प्रास्ताविक केले तर कृषी सहाय्यक महामुनी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पात्र शेतकरी बांधवांना गुलाबपुष्पे देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार सिराज तुळवे, नलिनी साठे, मंडळ अधिकारी अरूण गणतांडेल, तलाठी, कृषि सहाय्यक व शेतकरी बांधव उपस्थित होते.

8760 शेतकरी ठरले पात्र
23093 एकूण शेतकरी या योजनेनुसार पाच एकरापेक्षा कमी शेती असलेले असून त्यापैकी 12789 शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज केले. त्यापैकी 8760 शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यांना या वर्षभरात सुमारे पावणे दोन कोटींचे अर्थसहाय्य तीन हप्त्यात थेट खात्यात वितरित केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi MPSC Students Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा; म्हणाले, ‘आश्वासने नकोत, ठोस कारवाई हवी’

Nagpur News : विमानासाठी गेट उघडताना काळाचा घाला! लोखंडी गेट अंगावर कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू; दुसरा गंभीर

Kaygaon News : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अमळनेर येथे ‘आजी-आजोबा दिन’ उत्साहात साजरा

Velhe News : गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित जलनियोजनाला शासनाची मान्यता; वाजेघर, वांगणी व शिवगंगा खोऱ्यातील सिंचनाला मिळणार गती

MVA Legislative Council : विधानपरिषदेवरून महाविकास आघाडीत एकमत नाही, काँग्रेस, ठाकरे गटात ठिणगी पडली

SCROLL FOR NEXT