Printing of counterfeit notes in Chiplun 
कोकण

बनावट नोटां वटविण्या आधिच म्होरक्‍याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : येथे बनावट नोटांची हुबेहूब छपाई करून त्या मुंबई, ठाणे येथे वटविण्यासाठी गेलेल्या टोळीच्या म्होरक्‍याला ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिट पाचने बेड्या ठोकल्या. त्याच्या चौकशीतून इतर दोन साथीदारांच्याही मुसक्‍या पोलिसांनी आवळल्या. या त्रिकुटाकडून ८५ लाख ४८ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या. या आरोपींनी यापूर्वी बाजारात बनावट नोटा वटविल्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली.

चिपळूण येथील कळंबट गावात राहणारा सचिन आगरे याने गावातच प्रिंटर, स्कॅनर आणि कॉम्प्युटरच्या मदतीने बनावट नोटा छापण्याचा गोरखधंदा थाटला होता. या ठिकाणी त्याने दोन हजार रुपये दराच्या बनावट नोटा छापल्या. या नोटा सचिन ठाण्यात वटविण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिट पाचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कापूरबावडी येथे सापळा रचला.

या ठिकाणी नोटा घेऊन आलेल्या सचिन याला पोलिस पथकाने बेड्या ठोकल्या. सचिनला अटक करताच त्याचे साथीदार मन्सूर 
खान व चंद्रकांत माने या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. या तिघांकडून एकूण ८५ लाख ४८ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत पवार, अनिल सुरवसे, भूषण शिंदे, सहायक पोलिस उपनिरीक्षक बाबू चव्हाण, निवृत्ती महांगरे, देविदास जाधव, पोलिस हवालदार राजेश क्षत्रिय, विजयकुमार गोव्हे, मनोज पवार, शिवाजी रायसिंग, दिलीप शिंदे, शशिकांत नागपुरे, राजेंद्र गायकवाड, अजित शिंदे, कल्पना तावरे, सागर सुरळकर, यश यादव या टीमने कारवाई केली. 

कळंबट येथील सचिन आगरे यांच्या घराची तपासणी केली जाणार आहे. त्याने गावातील घरात नोटा छपाई केली असेल तर त्यासाठी वापरलेली यंत्रणा जप्त केली जाणार आहे. त्यासाठी आमची यंत्रणा कामाला लागली आहे. ठाणे पोलिसांच्या मदतीने आम्ही पुढील तपास करणार आहेत.
- भरत धुमाळ, पोलिस निरीक्षक, सावर्डे

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT