0 
कोकण

मुंबई-गोवा चौपदरीकरण ठेकेदाराचा काम सोडण्याचा प्रस्ताव 

राजेश सरकारे

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप ते कलमठ टप्प्यात चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या दिलीप बिल्डकॉन कंपनीने चौपदरीकरणाचे काम सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव या कंपनीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे पाठविला. चार दिवस पुलांची कामे वगळता उर्वरित चौपदरीकरणाची कामेही बंद आहेत. याला राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी दुजोरा दिला. 

झाराप ते कलमठ या हद्दीत महामार्ग चौपदरीकरणाचे 95 टक्‍के काम पूर्ण आहे. भूसंपादनातील त्रुटी तसेच स्थानिकांचे प्रश्‍न यामुळे कुडाळ शहर, बांबार्डे आणि कसाल या भागातील काही टप्प्याचे काम रखडले. महामार्गाची थ्रीडी प्रक्रिया होऊनही चौपदरीकरणासाठी जागा ठेकेदाराच्या ताब्यात आलेली नाही. दोन वर्षे प्रश्‍न सुटत नसल्याने अखेर महामार्ग ठेकेदाराने चौपदरीकरणाचे काम सोडण्याचा निर्णय घेतला असून, तसा प्रस्ताव महामार्ग विभागाकडे सादर केल्याची माहिती दिलीप बिल्डकॉनच्या प्रतिनिधीकडून देण्यात आली. 

महामार्ग ठेकेदाराच्या काम सोडण्याबाबत महामार्ग अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, ठेकेदाराकडून तसा प्रस्ताव आल्याची माहिती दिली. मात्र, हा प्रस्ताव सध्या स्थगित ठेवला असून, महामार्ग ठेकेदाराशी या प्रश्‍नावर चर्चा सुरू आहे. लवकरच तोडगा निघेल, असेही महामार्ग अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

महामार्ग चौपदरीकरणांतर्गत झाराप ते कलमठ या टप्प्यात झाराप ते कुडाळ शहर हद्द आणि कणकवली गडनदी पूल ते कसाल बाजारपेठ बॉक्‍सवेलपर्यंत चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मधल्या टप्प्यातील कुडाळ शहर हद्दीत सर्व्हिस रोडच्या मुद्यावर काम थांबले. बांबार्डे पूल येथेही भूसंपादनात अडथळे आल्याने तेथील काम ठप्प आहे. कसाल येथेही जागेचा प्रश्‍न अजून सुटलेला नाही. 

चौपदरीकरणाचे काम बंद 
चौपदरीकरणातील अडथळ्यांची मालिका संपत नसल्याने अखेर रविवार (ता. 1)पासून दिलीप बिल्डकॉन कंपनीने चौपदरीकरणांतर्गत डांबरीकरण, सपाटीकरणाची कामे थांबवली आहेत. सध्या फक्‍त कणकवली शहरातील उड्डाणपूल, तसेच जानवली आणि कसाल येथील नदीवरील पुलांची उर्वरित कामे सुरू ठेवण्यात आली आहेत. 

संपादन : विजय वेदपाठक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT