कोकण

‘सुंदर मी होणार’मधून पुलंना आदरांजली

मकरंद पटवर्धन

रत्नागिरी - अष्टपैलू कलाकार, लेखक, दिग्दर्शक पु. ल. देशपांडे यांची जन्मशताब्दी सुरू झाली आहे. पुलंचे ‘सुंदर मी होणार’ हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत सादर करून खल्वायन संस्था पुलंना आदरांजली वाहणार आहे. 58 व्या राज्य नाट्य स्पर्धेत 20 नोव्हेंबरला स्वा. सावरकर नाट्यगृहात प्रयोग होईल. सध्या नाटकाच्या जोरदार तालमी सुरू आहेत.

पुलंनी 1958 मध्ये हे नाटक लिहिले. सुरवातीला ते स्वतः व सुनीताबाई यात काम करत होते. संगीत रंगभूमीला संजीवनी देण्यासाठी झटणार्‍या खल्वायनने यंदा या नाटकाचे शिवधनुष्य उचलण्याचे ठरवले आहे. पुलंचे हे नाटक विनोदी नाही. कलाकारांना अवांतर टाळी देण्याची संधीही नाटकात नाही. संस्थेने खालसा झाली, पण कुटुंबप्रमुखाची मानसिकता बदलली नाही, कुटुंबाची घालमेल अशा आशयावर नाटक गुंफले आहे.

या नाटकामध्ये कलाकार शमिका जोशी, दीप्ती कानविंदे, श्‍वेता जोगळेकर, वामन जोग, मनोहर जोशी, विजय जोशी, गणेश जोशी, कौस्तुभ जोशी, आशुतोष नाडकर्णी, हेरंब जोगळेकर अभिनय साकारणार आहेत. पार्श्‍वसंगीत गौरव महाजनी, रामदास मोरे, प्रकाशयोजना गोपिकांत भुवड, मंगेश लाकडे, वेशभूषा श्रीनिवास जोशी यांची आहे.

“जन्मशताब्दीमुळे गेल्या वर्षीपासून पुलंचे एखादे नाटक स्पर्धेत करण्याचे निश्‍चित केले होते. नाटकाच्या तालमा दोन-तीन महिने सुरू आहेत. पुलंचे हे नाटक भावनाप्रधान असून मानवी मनाचे वेगवेगळे कंगोरे पाहायला मिळाले. राजवाड्याच्या एका दालनात हे नाटक घडते. त्यामुळे दादा लोगडे यांनी नवे नेपथ्यही केले आहे. हे नाटक आमच्यासाठी आव्हानच आहे.”

- मनोहर जोशी, दिग्दर्शक

तबलावादक जोगळेकरांची रंगमंचावर एंट्री

रत्नागिरीचे प्रसिद्ध तबलावादक हेरंब जोगळेकर या नाटकाद्वारे रंगमंचावर प्रवेश करत आहेत. गायक कलाकाराची भूमिका ते साकारणार आहेत. एरवी ते खल्वायनच्या संगीत नाटकांना व विविध ठिकाणच्या संगीत मैफलींना तबलासाथ करतात. आता भूमिका करायची असल्याने ते सध्या तालमीत व्यस्त आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT