कोकण

पर्ससीनची घुसखोरी

सकाळवृत्तसेवा

मालवण - जिल्ह्याच्या सागरी हद्दीत ऐन गणेशोत्सवात पर्ससीनची घुसखोरी वाढली आहे. आज सायंकाळी घुसखोरी करणाऱ्या रत्नागिरी येथील एका पर्ससीन ट्रॉलरला देवगड येथील मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. रात्री उशिरा हा ट्रॉलर येथील बंदरात आणण्याची कार्यवाही सुरू होती.

जिल्ह्याच्या सागरी हद्दीत परराज्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील पर्ससीन ट्रॉलर्सची घुसखोरी होत असताना ती रोखण्यास पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक हे पुन्हा एकदा अपयशी ठरल्याचा आरोप करत पारंपरिक मच्छीमारांना सत्ताधाऱ्यांकडून जी आश्‍वासने दिली, त्याची पूर्तता होत नसल्याने पारंपरिक मच्छीमारातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आज परराज्यातील ट्रॉलर्सची घुसखोरी झाल्याचे दिसून आल्यावर आक्रमक बनलेले मच्छीमार नेते बाबी जोगी यांनी हे ट्रॉलर्स मत्स्य व्यवसाय विभागाने पकडावेत, अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा दिला.

दरम्यान, येथील सिंधुदुर्ग किल्ल्यानजीकच्या समुद्रात आज सकाळीच परराज्यातील हायस्पीड, पर्ससीन ट्रॉलर्सनी घुसखोरी करत मासळीची लूट करण्यास सुरवात केली. मत्स्य हंगाम सुरू झाल्यानंतर परराज्यातील ट्रॉलर्सचे अतिक्रमण सुरूच असल्याने पारंपरिक मच्छीमारांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. घुसखोरी रोखण्यासाठी शासनाने मत्स्यव्यवसाय विभागास आदेश दिले असतानाही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. मत्स्यव्यवसाय विभागाची गस्तीनौका लवकरच दाखल होईल असे सांगण्यात आले होते.

पर्ससीननेट मासेमारी हंगाम सुरू झाल्यानंतर त्यांच्याकडून जिल्ह्याच्या सागरी हद्दीत होणारी घुसखोरी रोखण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात मत्स्य व्यवसाय विभागाने गस्तीनौका घेत त्यावरून गस्त घालण्याचे निश्‍चित केले होते; मात्र या गस्तीनौकेचा वेग परराज्यातील हायस्पीड, पर्ससीन ट्रॉलर्सचा वेग पाहता फारच कमी असल्याने घुसखोरी रोखण्यास ती अपयशी ठरली आहे.

संघर्ष होण्याची चिन्हे 
मत्स्य व्यवसाय विभागाची गस्तीनौका सात ते आठ दिवसांत दाखल होईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, अद्याप गस्तीनौका दाखल झालेली नाही. त्यामुळे परराज्यातील ट्रॉलर्सची घुसखोरी वाढतच आहे. काही दिवसांत स्थानिक रापणकर संघांना मासळीची चांगली कॅच मिळत आहे. याची माहिती मिळाल्यानेच परराज्यातील ट्रॉलर्स जिल्ह्याच्या सागरी हद्दीत सात ते आठ वावाच्या आत घुसखोरी करून मासळीची लूट करत आहेत. यामुळे पारंपरिक मच्छीमार आणि ट्रॉलर्स यांच्यात संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: बिश्नोईने दूर केला तुफानी खेळ करणाऱ्या सुनील नारायणचा अडथळा, कोलकाताने गमावली दुसरी विकेट

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT