चिपळूण (रत्नागिरी) : येथील पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती निवडणुकीच्या आधी शिवसेनेच्या सदस्यांची पार्टी मिटिंग झाली नाही. निवडीत शिवसेनेच्या आजी- माजी आमदारांनाही विश्वासात घेतले गेले नाही. त्यामुळे चिपळूणची शिवसेना नक्की कोण चालवतोय, असा प्रश्न सेनेच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.
दुसऱ्या टप्यात राष्ट्रवादीच्या रिया कांबळे यांना सभापती तर शिवसेनेचे गटनेते राकेश शिंदे याना उपसभापतीपद देण्याचे ठरले होते. मात्र कादवड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेले राष्ट्रवादीचे सदस्य पळविण्याचा प्रकार शिवसेनेकडून घडला. यात शिवसेनेचे पंचायत समितीतील गटनेते राकेश शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली त्यामुळे शिंदे यांचा उपसभापतीपदावरून पत्ता कट करण्यासाठी खेळी सुरू झाली. कामथे गणातील पंचायत समिती सदस्या रिया कांबळी या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या समर्थक मानल्या जातात. त्या सभापती झाल्या तर जाधव यांचा पंचायत समितीत हस्तक्षेप सुरू होईल या भितीने कांबळे यांचा पत्ता कट करण्याचे प्रयत्न सुरू होते.
हेही वाचा - पतीच्या मृत्यूनंतर एकलुत्या एका मुलावर नियतीचा घाला; यशराजची रंगपंचमीची अंघोळ ठरली अखेरची
राष्ट्रवादीचा सभापती बसावा यासाठी शौकत मुकादम यांनी आक्रमक भूमिका घेतली त्यामुळे धनश्री शिंदे यांना सभापतीपदाचा राजीनामा द्यावा लागला. सभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शिवसेनेकडून उपसभापतीपदासाठी अनेकजण इच्छूक होते. पार्टी बैठक झाली तर आपली इच्छा व्यक्त करण्याची तयारी अनेकांनी दर्शवली होती. मात्र शिवसेनेकडून पार्टी बैठकच घेण्यात आली नाही.
सुनील तटकरे, अनुजा चव्हाण, रेश्मा पवार, राकेश शिंदे आदी उपभापतीपदासाठी इच्छूक असताना तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांचे नाव उपसभापतीपदासाठी निश्चित झाले. शिंदे यांचे नाव निश्चित करतानाही सदस्यांना विश्वासात घेतले गेले नाही त्यामुळे अनुजा चव्हाण यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्याचीही दखल कोणी घेतली नाही. काही सदस्यांनी आपले गाऱ्हाणे शिवसेनेच्या आजी-माजी आमदारांना सांगितले. तेव्हा त्यांनाही विश्वासात घेतले गेले नसल्याचे उघड झाले.
"चिपळूणची शिवसेना कोण चालवतोय हे नाव घेऊन सांगण्याची गरज नाही. पंचायत समितीत सुरू असलेल्या राजकारणातून शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांचा खरा चेहरा आता समोर आला आहे. आमदार भास्कर जाधव यांचे समर्थक सदस्य चिपळूण पंचायत समितीमध्ये आहेत. सदानंद चव्हाण दहा वर्ष चिपळूणचे आमदार होते. निवड प्रक्रियेत त्यांना डावलणे योग्य नाही. शिवसेनेकडे काठावरचे बहुमत होते तेव्हा काहींना आमच्या ग्रामदेवतेची आठवण झाली. आता राजीनामा का दिला याची विचारणाही अनुजा चव्हाण यांना कुणी केली नाही."
- जितेंद्र चव्हाण, माजी सभापती चिपळूण पंचायत समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.