कोकण

अधिकाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न; मंडणगडात बंगले, घरांचा शोध सुरू

प्रशासनाचा आवाहन पेलण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

मंडणगड : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे भेटीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात अधिकारी, पोलिस, कर्मचारी यांचा फौजफाटा दाखल होत आहे. पूर्वतयारीच्या नियोजन व आढावा बैठकीसाठी जिल्ह्यासह राज्य पातळीवरील व्हीआयपी व्यक्ती येत असल्याने त्यांच्या व्यवस्थेसाठी स्थानिक प्रशासनाने कंबर कसली आहे. निवासी व्यवस्थेसाठी शहरात हॉटेल, लॉज यांची उपलब्धता अल्प असल्याने परिसरातील बंगले, सुसज्ज घरांचा शोध घेण्यात येत आहे. दौऱ्यानिमीत्त विविध स्तरातील अधिकारी मंडणगड तालुक्यात दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर येथे येणाऱ्या अधिकाऱ्याची निवासाची व्यवस्था कोठे करायची, असा प्रश्न आहे.

शहरातील व तालुक्यातील हॉटेल, लॉज व निवास व्यवस्था करणाऱ्या केंद्राकडे मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या अधिकाऱ्यांची निवासाची सोय करण्याची क्षमता नाही. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा खासगी बंगले शोधत असून दौऱ्याच्या निमित्ताने तालुक्यात दाखल होणाऱ्यांची दोन दिवस आधीपासून यथायोग्य सोय करणे ही प्रशासकीय यंत्रणेसमोरील मुख्य आव्हान राहणार आहे.

पर्यटनदृष्ट्या तालुका विकासाच्या प्रवाहात उपेक्षित राहिल्याने म्हणावी तशी निवासी व्यवस्था झालेल्या नाहीत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्यामुळे या उणिवा स्पष्ट दिसून येत आहेत. शिरगाव येथे विविध गोष्टींचा समावेश असणारी ७० लाखांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून हेलिपॅड तयार करण्यात आल्याने त्याच परिसरातील बंगले, फॉर्म हाऊसमध्ये व्यवस्था करण्यावर भर देण्यात आला आहे.

बाजारपेठ, दुकाने बंद ठेवण्याची शक्यता

शिरगाव ते आंबडवे या बारा कि.मी.च्या प्रवासात भिंगलोळी, मंडणगड शहर, तुळशी, पाले, पाचरळ गावे येत असून या ठिकाणी सुरक्षेची काळजी घ्यावी लागणार असल्याने त्या दृष्टीने प्रशासन उपाययोजना करण्यावर भर देत आहे. मंडणगड शहर व पाचरळ गावांतून प्रवासाचा मार्ग असल्याने याठिकाणी विशेष काळजी घेतली जात आहे. त्यादृष्टीने या परिसरातील बाजारपेठ, दुकाने व घरे त्या दिवशी बंद ठेवण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत ४ नवीन पोलीस ठाणी, ३ DCP झोन आणि २ ACP विभाग होणार, १,४४८ नव्या पदांना मंजुरी; गृह विभागाचा मोठा निर्णय!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीसाठी राजस्थान रॉयल्सने नव्हे, तर 'या' टीमने लावलेली पहिली बोली... आज त्या संघाचं चित्र वेगळं असतं

MPSC Result Exam : एमपीएससीचा निकाल लागला! सोलापूर जिल्ह्याच्या 'विजय'ची बाजी; पाहा एका क्लिकवर यादी

Vaibhav Suryavanshi: या पोरात काहीतरी खास आहे; फक्त त्याला पाहण्यासाठी मी आणि माझी बायको...' R Ashwin झाला जबरा फॅन

Pune Warje News: पुण्यात भरधाव मद्यधुंद कारचालकाचा कहर; वाहनांना धडक देत पोलिसांना चकवण्याचा व अपहरणाचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT