कोकण

सेवानिवृत्तांचा प्रश्‍न: आम्ही आता विष पिऊन मरायचे का?

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - पेन्शनच्या प्रलंबित प्रश्‍नांवर वारंवार दुर्लक्ष होत असल्याची तक्रार करत नाराज झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी ‘आम्ही आता विष पिऊन मरायचे का’ असा प्रश्‍न पेन्शन अदालतमध्ये उपस्थित केला. या प्रकारामुळे सर्वच अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी गंभीर दखल घेत त्यांच्या समस्यांवर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

जिल्हा परिषद आवारातील पेजे सभागृहात शनिवारी (ता. २०) पेन्शन अदालत आयोजित केली होती. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सावंत, मनीषा देसाई, प्राथमिक शिक्षणाधिकारी देवीदास कुलाळ आदी उपस्थित होते. यावेळी पेन्शनधारकांनी आपल्या समस्या मांडल्या. अप्रशिक्षित शिक्षकांना शासनाकडून निवृत्तिवेतन मिळत नाही. न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला.

नंदुरबार जिल्ह्यात अप्रशिक्षित सेवानिवृत्त शिक्षकांना पेन्शन सुरू केली; परंतु रत्नागिरी जिल्ह्यात ३५ अप्रशिक्षित शिक्षक आहेत, ज्यांना अजूनही पेन्शन सुरू केलेली नाही. ती लवकर सुरू करावी, अशी मागणी केली.

याबाबत गोयल म्हणाल्या, नंदुरबारमध्ये अशा पद्धतीने पेन्शन सुरू असेल, तर संघटनेने कागदपत्रे जिल्हा परिषदेकडे सादर करावीत. रत्नागिरीतही पेन्शन सुरू करता येईल.२००४ साली सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या वारसाला अद्यापही अनुकंपाखाली नोकरी दिलेली नाही. त्यावर तत्काळ कार्यवाही करा, असे आदेश गोयल यांनी दिले.

राजापूर तालुक्‍यातील २००७, २००८ आणि २००९ मधील सेवानिवृत्त निवडश्रेणीतील ५५ शिक्षकांपैकी २८ जणांची सेवापुस्तके मिळालेली नाहीत. त्यामुळे त्यांना सेवानिवृत्तीपासून वंचित राहावे लागत आहे. ही सेवापुस्तके तत्काळ शोधण्याचे आदेशही आंचल गोयल यांनी दिले.

पेन्शनधारकांना मदतीचे आश्‍वासन
पेन्शनधारकांबाबत जिल्हा परिषदेच्या अधिकारातील जे काही निर्णय असतील ते विनाविलंब घेण्यात यावेत, अशी मागणी सेवानिवृत्तांची जनसेवा समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र घुडे यांनी केली. यावर गोयल यांनी पेन्शनधारकांना सर्व मदत केली जाईल, असे आश्‍वासन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT